Posts

परमात्मा त्याचा शोध मानसा

Image
परमात्मा त्याचा शोध मानसा   गर्विष्ठ मनात कपट नको  सोड मोकळ्या  वाऱ्या समान सत्य वचनी अंगी लेपवून  त्याचा सुगंध वाही बहू दिशा कुट नितीचा तुच धागा झाला जीव कुंपण तुझा कोन बांधून ठेवी आत्मा परमात्मा त्याचा शोध मानसा रा.भा.मेकेवाड 

त्याशी राखा चक्रधर

Image
🙏त्याशी राखा चक्रधर 🙏   मोह मम नश्वरा देह अहम जडा कौन पाझर पाशान रुपाय काळीज जयाचे कैसे त्याशी उमगाया मानुस प्रभू रूपी अंकुर फोडीत  ममत्व रुपाय ह्रदयी ज्याची  बिज तयाशी करुनाकार उमगाया बहू हितकार त्याशी राखा चक्रधर   ... राजेश मेकेवाड  💞  

घेऊन जावे तुझ स्वप्न गावा प्रेम कविता

Image
  कालचा पाऊस आजचा कारवा  एक डोळा पानावलेला  जपून ठेव नव्या वर्षात  ओठावरचे हास्य जरा  कोण जाणते स्पंदनाला  सारे मर्म बंद तुझे  जरी यातनेचा पुर मी  घेऊन जावे तुझ स्वप्न गावा  राजेश मेकेवाड 

नव्या वर्षी काय लिहावं अवगत नाही

Image
नव्या वर्षी काय लिहावं अवगत नाही  मन मात्र कुठेच रमत नाही   सैरावैरा जीव घेऊन वाट त्याला दिसत नाही   जातो कोणत्या गावा ते मात्र कळत नाही  अन् नाही पाणी नाही सुख नाही दुःख नाही  ठोक्यात कोणी चुकलं नाही  हृदयात कोणाच्या गेलो नाही  मनात नव कोणी आलंच नाही  आला दिवस गेला निघून  तो दिवस मात्र पुन्हा भेटलाच नाही  नवं काय अन् जुन काय  मला मी मात्र कळलोच नाही  परकेच होते माझे वाटले  वाटून वाटून संपून गेले  दिवसा मागून दिवस गेले  माझे मला शेवटी वाटलेच नाही  स्वप्नि सजले सांगून टाक  मनाचे फासे मोकळे वाट  आलो तसा निघून जाईल  नाव मात्र मिटवून टाक  देहावरती कोरून ठेवले  मध्यरात्रीच्या हुंदक्यावरती  जन्मोजन्मी नांदो वैभव  सारिका तुझ्या जीवनामध्यी  राजेश मेकेवाड  💦💞

वैकुंठ वासी कविता nikita Uttam mirwad तीच्या जिवनावर आधारित

Image
  वैकुंठ वासी  कोणी हृदयात माझ्या  येतील का सोयरे  सदा रुतणाऱ्या मी  काळजात रुतेन का  प्रेमाविण भेगाळले हात  माय बापाचे लागले नाही  वाढले कोराट झाडाच्या हाती  त्या वृधेस सावली नाही  गोदा काठी बालपण  बागडून एकट्यात  वैकुंठी सारे माझे  मजला पुन्हा भेटतील  गंगेत माझा अस्ती  कलश हाती सुटेन का  पुन्हा खेळण्यास लाठेत  मला विसरून जातेन का  भेटतील का माझे मला  सारेच अडवून वेशी वरती  विसावा सारेच माझा  शेवटी हसून घेतील का  रडून कोणी मला  एकट्यात शोधू नका  विलीन झाले मी स्वो हृदयाला छळू नका  सर्वांनी बांधले भांशिंग सुखाचे  देवाने बांधली गाठ  घ्यावे दिवस तेवढेच  तंतोतंत काट्यात  कवी  रा. भा .  मेकेवाड  Niki. 10/09/2019

गुण लभो सर्व समहीत

Image
  गुण लभो सर्व    समहीत   तूझ वरी होऊनी     तल्लीन मी दास भीके खाली हात     तरी दान देई दास  वेळ भीकाऱ्याचा     तही धर्म दानवीर  जगी सारे जीवन     ऐंशी माझे माहेर अंकुराच्या अंकुचीत   जिव माझा अणूवार  कैक धरावी आकाश   माझ्या च्यारित्र्याचा ठाव  मातीच्या जाळ्यामधे    प्रितीचेच कोंब  काया कोंबाचे विराट   गुण लभो  सर्व सम हित      ....  रा . भा.  मेकेवाड  

मी ऐवढाच बाटलो की तुझ्या ओठांवरती

Image
मी ऐवढाच बाटलो की   तुझ्या ओठांवरती देहाच्या या च्यारित्र्यावरती पाकळ्यांचा गुलकंद होऊनी मी  ऐवढाच   बाटलो   की    तुझ्या        ओठांवरती सांग रानी माझी होती  त्या पाखराची घाई झाली राघूच्या ह्या चोचीवरती कवटाची ती गानी झाली कवटाळलेल्या डहाळी वरती  दांळीबाची दाणी जडली  सैरा    वैरा    पाखराची चोच हुर हुर  चौफेरलेली         राजेश मेकेवाड....

सांज कळीचा

Image
सांज कळीचा    हळवे कुणी क्षणाचे  सोयरे कोणी मनाचे  हृदयात बंधनाचे .... खळखळते का हे सारे  कुण्या  भातुकलीचा  कुणा आसवांचा  ... कुणाचा  मंद वारा  कुणा छेळतो सांज कळीचा   तळमळ त्या दिव्याची  मर्मबंधात छेळते   .... जळते अंधार तुझा  तव तेवनारा दिप  हा ..     ....   राजेश मेकेवाड  

काळ रात्र का शीत होते

Image
  काळ रात्र का शीत होते  कधी लाजते कधी रुसवा मनात कधी गोड बोलते तर कधी गोडवा पुसते  कधी स्तुती माझी कधी खट्याळ बोलते  कधी दानवीर कधी भिकारी सांगते  कधी जिवलगा कधी वैऱ्यात ठसवते  कधी भेटते  कधी अर्ध्यात सोडते  कधी कळ्यात  कधी दगडात पहाते कधी डोळ्यात मुर्ती  कधी आरसा पुसते  कधी पावसात  कधी  वाऱ्यात सोडते  कधी आसवांच्या सोबती  कधी मिठीत भिजते  कधी कधी काळी रात्र   शित  का होते  सारी              राजेश मेकेवाड 

सत्य बदलतो ?

Image
 सत्य बदलतो ? वाटा बदलतो        दिशा नाही वेळ बदलतो          काळ नाही मानुस बदलनो        संघ नाही नाते बदलतो      नातलग नाही  राजा बदलतो     राजपद नाही शत्रु बदलतो        क्षत्रिय नाही  तलवार बदलतो     धार  नाही कवी बदलतो         काव्य नाही  दिशा बदलतो         ध्येय नाही  वेष बदलतो          मन नाही  जीवन बदलतो   जिवलग  नाही  माया बदलतो        ममत्व नाही  शिष्य बदलतो         गुरु नाही मुर्ती बदलती       देव नाही हृदय बदलतो   ऋतलेले नाही रंग बदलतो        रंगीन नाही  डोळे बदलतो       अश्रू नाही  पाठ बदलतो      शिक नाही    सत्य  बदलतो     सत्यच नाही           राजेश मेकेवाड 

शब्द नसते तर

Image
 शब्द नसते तर  पापन्यात तुझ्या मी लपलो नस्तो प्रेमाच्या शब्दात सापडलो नस्तो फासे जर नस्ते तुझ्या हातामध्ये जिवनाच्या खेळात पहिला आलोच नस्तो खेळ प्रेमाचा जर झालाच नसता  गंध घेऊन राज सुकलाच नस्ता माझेच मन मोहिले नस्ते कुणी सुंदरीच माझ्या प्रेमात नस्ती कुनी  तुझ्या पावला मागे आलोच नस्तो अपयशाचे ओझे घेतलोच नस्तो तुझ्या इशाऱ्यावर मी गेलो नस्तो यशाच्या अनंत शिखरावर बसलोच  नस्तो  अश्रूत तुझ्या मी शिरलो नस्तो  माझ्या दुःखांचा आनंद घेतलोच नस्तो वेदनेचे पाठ ह्रदयात सजलेच नस्ते पापन्यातून तुझ्या निसटलोच नस्तो                  .....   राजेश मेकेवाड 

दिवा होन जमल नाही दिव्यावरती कविता

Image
  दिवा होन जमल नाही दिवा होन जमल नाही प्रकाश करन जमल नाही जमल नाही व्यक्त होन्या झाकून ठेवन जमल नाही शुभेच्छा आल्या भर भरून मन मात्र भरल नाही भेटली सारी नाती गोती मानसात कोणी दिसल नाही घरा मध्ये बुजगावन्यासारखा परक्या मध्ये बसलो नाही  ज्योती समान तेवने जमले  काजळी होऊन मिटलो नाही  ....  राजेश मेकेवाड  

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा

Image
  भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा ज्यानी ज्यानी लवंगी फटाक्याचा सर सोडवून एक एक फटका वाजवला त्या सर्व भाग्यवंताना दिवाळीच्या शुभेच्छा!! ज्यानी ज्यानी मोती साबणाचे शेवटचे तुकडे संपेपर्यंत तो साबण वापरला त्या काट्कसरी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!! ज्यानी ज्यानी गल्लीतील फुसके फटाके गोळा करून त्यातील दारु काढून मोठा धमाका केला त्या धाडसी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!   ज्यानी किल्ले बनवताना आरोग्य केंद्रातून सलाइन पाईप आणून पाण्याचे कारंजे बनवले त्या तंत्रज्ञानी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!! ज्यानी ज्यानी सांडशीचा वापर करून टीकल्या दुसऱ्याच्या पायाजवळ फोडल्या त्या करामती लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!! ज्यानी ज्यानी फराळाचे पदार्थ जसे लाडू चकल्या चड्डीच्या खिशात घालून गुपचूपपणे खाल्ले अशा खवय्याना दिवाळीच्या शुभेच्छा!! * भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा.* 😄😄💐💐💐

सांग सखे हा कमळ कुणाचा प्रेम कविता

Image
सांग सखे हा कमळ कुणाचा  पाण्यावरती घाव घालूनी  नाही कुनाला दिसला डोळ्यामधल्या व्यथा पाहूनी अश्रू मधला बोल सुटला  नव जिवनी पाझर माझ्या चालत्या झाल्या गंगा राई   खळखळणाऱ्या यमुना काठी  तुज विण काई भान नाही  या देहाचे वारूळ झाले  त्या देहाला ठाऊक नाही  दिवा झाला राख जरी  पणतिचा त्या मंद मंजरी   वाहून गेला वारा तयाचा  कळ्या वरती गंध फुलांचा  सांग सखे हा कमळ कुणाचा  तुज पापण्यासाठी दरवळणारा        ..... राजेश मेकेवाड 

पाचट

Image
  पाचट   पाचटात जन्म माझा  पाचटात राहनी  पाचटात बागडणे  पाचटात जिवा बांधणी  पाचटात आयुष्याचे  कित्येक केले घाव त्याने पाचटाचे कोमल  कुणा सांगावी ऊखाणे दैना जीवाची   सखा सोबती  पिढ्यान पिढ्या  पाचटाची कहानी  कितेक माझ्या  पाचटाविना न कळल्या  गोड ऊसाला  करवट्या का लागल्या  वाचतात का तुम्ही  पाचटातले पाहू  पिढ्यांच्या वाटी   पाचटा का आल्या शेवटी                राजेश मेकेवाड ...

बप्पानो सर्वांचे दुःख घेऊन आलो मी

Image
बप्पानो      सर्वांचे दुःख घेऊन आलो मी देवाच्या देवाऱ्यातून  पैशाच्या कळसावरून घराघरातून आलो मी मनामनातून आलो मी  ज्याचे त्याला सुख देऊन  दुःख घेऊन आलो मी हास्य सारे सर्वाशी वाटून   जनाजनातून  आलो मी  राजेश मेकेवाड 

सांग समजून त्याला प्रेम कविता

Image
सांग समजून त्याला   माझे झिर्ण झालेले काळीज  सांग समजून त्याला  अजून तुझा ध्यास सोडत नाही  सांग समजून त्याला  पाना   पाना दडतो  माझा जीव कळ्याचा  सहवास नाही त्याला  आजपर्यंत कोणाचा  सांग समजून त्याला  तुझा चंद्रासारखा चेहरा  अन् चंद्रकोरीव नजरा  अजून विसरत नाही  सांग समजून त्याला  पौर्णिमेच्या दिवशी  डोळे भरून पहावे  इतके सोपे नाही आता  हा चंद्रग्रहणात आहे तरी कोणाच्या  सांग समजून त्याला       .... राजेश मेकेवाड 

सुरळीत व्हावी मृगजळा अंत

Image
 सुरळीत व्हावी मृगजळा अंत मनुष्य प्राण्यांनी केलेला  माझा सतत तिरस्कार   काळाचा चौफेरी उपमर्द कुठेच न दिसणारी संज्योत  नवचैतन्य  बहरणाऱ्या आशा   उध्वस्त तेव्हाच झाल्या  माझ्या कष्टा सहीत घामाचा  नात्यानी केलेला दूरोपयुग   कोठडी आडचे मर्मबंध  प्रेम भंगाच्या पाऊल खुणा  नश्वर देहाची मजला  खंत  सुरळीत व्हावी मृगजळा अंत           ....राजेश मेकेवाड 

शेतकऱ्याचे बळ

Image
शेतकऱ्याचे बळ शेतकऱ्याच्या कणा कणाला  लुटून खाते खुडच्या  इथल्या  देहाचे या वारूळ झाले  कोणता भडवा पुंज घालतो तुला   तु लुटेरू नाहीस राजा  तु भिकारी नाहीस दाता  तुझ्या उन मोठा दानी या जगात कोठे  दुसरा  पहा एकदा मुंग्यांचा  कल्होळा  शिवारात आल्या शत्रूला  पाय परतीची विवष्य त्याला   बळ असो त्या संघ  तिला  सत्तेवरची टवाळ खोळ  अस्वासनातली नासकी ढोर  कैक त्याहुन भारी असते  उकिरड्यातली गाढव थोर                  राजेश मेकेवाड   

तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा

Image
 तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा  देव दत्त तुझ लागे मझ ध्यास सोसले मी जिवा परहित  तंयाची रुपांतर पहावी किती  तुम्हाविन न तिळभर चुकवीत  न जानावया मी कुठे न काही  चराचरा तुम्ही बहुरूपी देवराय  हा कोमल तुमया कायेचा चहुफेरा    तुम्हा सेवे जिवा झिजवाया असावा   आदी अनंता ब्रम्हांडनायका कणकणती उभा तुझीया मायेचा  सहवास लाभो निराकार राया   तुम्हा चरनी असावा पडोनी राजेशा            शब्दांकन : रा.भा.मेकेवाड

मराठीसाठी लढतो आम्ही

Image
मराठीसाठी लढतो आम्ही   शेवाळलेली  हिरवळ  खळखळणाऱ्या  द ऱ्या  पाशान रुपी उभी आहे  मराठ  पिढ्यान पिढ्या  तारकांच्या साक्षीरुपाने  पेरणी घालतो माय मराठी  माती वरती पाय रोवणी  मराठीसाठी लढतो आम्ही                 राजेश मेकेवाड.....

उन्हाळलेला माळ तुझा सारिका

Image
उन्हाळलेला माळ तुझा सारिका  कोण माझे ठाव नाही  या हृदयाला दार नाही  भेटे अजून कोणी अवकळीचा  पाऊस त्याचा भानात नाही  काळजाला टिचले माझ्या  टाके दोर निर्बंध नाही  अजून कोणाच्या भावनेला  मी कुंपण केले नाही  मी हृदयाला माझ्या  दार लावलो नाही येणाऱ्याचे स्वागत अन्   जाणाऱ्याला बंध नाही  चंद सुखाचे पहाते सारेच  मी दुःख वेचता दमलो नाही  काटा होऊनी चालणे माझे  फुल होणे जमले नाही  मधमाशांचा तो गुंजावा  फुला सहित अलवार कळ्याचा   चौफेर  सारा गंध पसरत  बागी झेंडूच्या तो मोगरा असावा  मनात माझ्या दरवळणारा  ओघळणारा पाझर होता तुझ्या साठी खळखळ नारा  उन्हाळलेला  हा माळ होता                         सारिका ... ... राजेश मेकेवाड 

शेतकऱ्याची लूठ व अवस्था

Image
शेतकऱ्याची लूठ व अवस्था  दोन वर्षाचा उन्हाळा         झाले शिवार मोकळे मी राबतो उन्हात             घाम टिपते रानात सूर्याशी झेलून पाठीशी           मी हआकतओ नांगुर दुरुन पाहतो सावली           वखर चालते उन्हात उन्हाळ्याच्या दिवसात        राब राब रानात घोट घेऊन पाण्याचा      मशागत करतो रानाची घोट घोट पिऊन पाणी     दिवस झापतो घामात माझ्या घामातून येते      उभ्या पिकाचा गंध या घामाची रे चव      सर्व फळाची या गोडी श्रावण महिन्यात       येथे पावसाच्या सरा  सर्व परीवाराचा      आनंदात शेतात मेळावा बीज घेऊन हाती      भरावी लक्ष्मीची ओठी हिरवळले बोलके डोलके     पिक नांदते दिवास्वप्नात  बीजा फुटले अंकुर      वर आकाश मोकळे अंकुराचे शिषू रोप      वर तारुण्य सूर्य प्रकाश बंद डोळे दिपते      सूर्य ओकताना आग  उन्हात बाल रोप        तडफडते अंगावर कसे पहावे डोळे भरून        म्हणून पहातो वर  कोठे दिसना गाजा वाजा    कशी मिटवू तहान रोप कोसळता खाली      नाही डोळ्यातही पाणी आता कोठून भरू      मझ काळीची ओठी घरी नाही खाया आता      भाकरीच दान जमीन देऊ आबा , बाबा , तात्यास     मंग मिळेल दान आता करू रात दिवस मंजुर

दु:खाचा गुच्छ

Image
 दु:खाचा गुच्छ  कुठे शोधू तुम्हास  मी , माय बाप  आज सूर्य भी चिंब  झाला इथं  चांदण्या भी शिंपी  अश्रू प्रकाश  आज काळोख चंद्रात  दिसे फक्त कोर  पापण्याच्या पिंजऱ्यात  बांध मुला अश्व  नाही पदर मायेचा  तुझे पुसणार डोळ  चहुदिशाचे संकट  नाही पेलनार बाप  घरटे सोडून गेले  ते दोन चिव चिव  आज पंखानाही बळ  आले शोधात  वृक्षा खाली छाया पडे  फळ त्याच्या सावलीत  नाजूक डोळ्यांमध्ये  अश्रू आज टोचतात  मनामध्ये ध्यास तोच  आज जीवनाच्या वाटेवर  चालण्याच्या धुंदीमध्ये  सुख उधळून जाई  जगताना आठवण  दुःखाचेही गुच्छ देई  ... राजेश मेकेवाड 

नवलाईची राणी

Image
 नवलाईची राणी  हे नव्हती चे झाड  फळ रसाळ गोमट  हुल हुल गोडव्याची  कोण चाखेल हे पाढ  सैर भैर शिवाराचे  राघू झाले गोळ  राणी तूच एक  आणि राजा मीच एक  पिवळे से पान यावे  लाजुनी इशाऱ्यात  वाऱ्याची ही भीती त्याला  कधी कळेल हे नजरेत  ह्या सावल्याच्या संघ  मैना गाते गाणे छान  काणी येता तिचा सूर  राघू गातो गाणे संघ  ...राजेश मेकेवाड 

घडव तू

Image
 घडव तू  सदैव खेळतो संघर्षात जीवन  कधीं न सांगता प्रेयसीला  घडलो फक्त तिच्यामुळे  मनामनी प्रेम सांगताना  हरवले डोळे तुझ्याच वाटेवरती  पापण्या पिकल्या एकाच चेहऱ्यावरती  वाटेलाच माहित तुझ्या पावलाचे पाठ  शोधात गेले सारे माझे बालपण  तुझेही सजावे माझे ही फुलावे  वाऱ्याच्या धुंदीत साऱ्याला सांगावे  कधी न सांगता तुलाही  मुके शब्द थोडे माझे कळावे  वाऱ्यालाही दिसू नकोस  मनाला ही छळवू नकोस  लपून छपून ये ना संग  ठोक्यालाही सांगू नकोस  घडवायचे तेवढे घडवून जावे  कधी कोणाला न सांगावे  हृदयाच्या भावना मनाला सांगून  प्रेमातून सर्वांना घडवून जावे  .... राजेश मेकेवाड 

माहेर ही झाले मग सासरवास

Image
माहेर ही झाले मग सासरवास तुडवीत आईची माया  का रांगले तिच्या अंगणात  पदरात आज झेलताना  का सांगते तुझ्या ममतेत  लडिवाळ बापाच्या हाती  का झाला आज दूर  अंगणातले झाले लाडक्या  मज आता माहेर  तव नव वाटे हे खरे जीवन  परक्याची ओठी ओली सावरून  सुटला हात एक दान घेऊन  माहेर ही झाले मग सासरवास ... राजेश मेकेवाड 

ही रंग सारी का तुझी

Image
ही रंग सारी का तुझी  ओळख कुठे धुक्यापुढची आयुष्य हे दवा सारखे  पाहून मन भरून जाते  क्षणात ओले का ते विसरते  वळणावीना वळत जाते  आठवणी का वळून येते  दिसता पुढे तेच धुके  तुझ्याविना का अतुरलेले   सांग सखे मना थोडे  तुझ्यासाठी प्राण प्रिऐ  मना  माझ्या लागलेली ही रंग सारी  का तुझे  ...राजेश मेकेवाड 

गाव जुना झाला माझा

Image
गाव जुना झाला माझा   गाव जुना झाला माझा  वाटा जुन्या झाल्या   हरवलेल्या जखमांचा  तो जिवंत स्पर्श  झाला  दारावरची फुले ती   पुन्हा सूगंधीत झाली  त्याच कळ्या वरती  ती पाखरे जुनी झाली  फुले गेली दाही दिशा त्याचा भास दरवळत होता  त्या झोपडी पाशी का  माझा जीव गुदमरत होता  राजेश मेकेवाड 

नागपंचमी

Image
नागपंचमी  होती नागदेवता  आराध्य दैवत आमची  नागपंचमीला पुंजून  भयमुक्त झालो नागाची  जळत्या नागावरती लावून दुधाची धार  शितलतेची पुजा   राजा परिक्षीताची परिक्षा झाली  अर्जुनाचा पुत्र  परिक्षेत पुत्र जन्मजेनी आस्तिक ऋषी मुनी  श्रावण नागपंचमी झाली   राजेश मेकेवाड   

पुर्वजांनी मातीत शोधला

Image
पुर्वजांनी मातीत शोधला होऊ  सारी हिरवळ  या रानाची या वनाची  या दऱ्या खोऱ्यावरती   लेकरवाळ्या धरेची   पाषाण वरती टिपून डोळा   विलगुन जावी आग सारी अश्रूची  व्हावी वलय माझ्या  फुटून बहर जीवनी  यावी  डोंगरावरती हिरवळीचा  मस्त की शोभावा  टिळा  पुर्वजांनी मातीत शोधला  नभासी भांडुन ओलावा  तुझीया असेल हाती  मातपितच्या पुण्याईचे  नाम स्मरणात आले   मंग त्या विठ्ठल रखुमाईचे  राजेश मेकेवाड 

काठीला सहारा

Image
काठीला सहारा  उंबऱ्या  वरती मोगरा    फुलांचा सोहळा मांडला वेली वरती कळ्यांचा          सुगंध  चौफेर झाला  मनात   पाखरांचा त्या         जिव्हाळी साचलेला रंग जीवनी अनेक         किलबिलाट त्या क्षणाचा   बहरलेल्या ऋतूंचा        मनमोकळा श्रावण झाला  चिंब झाली धरा             वाटला लेकुरवाळा वारा  चालतांना डगमग मी   त्या काठीला असावा सहारा  मझ डोळ्याला हवा     अजुन खळखळ नारा झरा   राजेश मेकेवाड                                                    आजोबावर 

डोळे तर येणारच

Image
 डोळे तर येणारच  प्रेमाची पाझर ओथंबून ओघळ नार  पाहून डोळ्याला डोळ्याशी  भेटणार  जीवनात तोच एक का चुकवावा   डाव  त्या क्षणास थोडे कधी उलगडून घेणार  जे पाहिले अनेक रंग रूप आजवरीचे  त्यावरती  ही वैद्य वाणी व्हावी  अमरत्व  अन् भविष्यात अशा अनेक मरन पावतील  कितेक रोग राईच्या साथी वैद्य हातानं  राजेश मेकेवाड 

वाट माझी स्थीरावरलो

Image
वाट माझी स्थीरावरलो    तुला पाहीलो  अन्  माझा मी न राहीलो  मिठी भरून तुझ्या  साठी नवं जन्म झालो  जन्मोजन्मी वेड्यासारखी प्रातः  काळ झालो  सांज माझी तुझ्या सवे  स्नेहीत फुलवत राहीलो  रात्र तारकांची किलबील    पाखरांच्या चोची टिमटिमलो  कंखर  पाषाणावरती   हिरवळ  होऊन दरवळलो  खळखळलो  या देहावर ती   सत जन्माचे पुर होऊनी  नदी होऊन डोळी तुझ्या  वाट माझी स्थीरावरलो  राजेश मेकेवाड 

राधे राधे

Image
राधे राधे कृष्ण रंगात रंगला   रंग तुझा सावळा   सुखांचा झाला  हरी त्या राधेचा     सांगून जाते हिरवळ  कना कनातला जिव्हाळा  विठ्ठल आवडी त्या  निवडी जिवीताला   फुला फळाशी देऊनी   तुझीया  रंग रुपेरला    माणसाच्या तोंडून का  सांगतोस  तु  विकारा  धन्य  ती राधा  धन्य तो सावळा  कुठे  अंधारात  मंत्र मुग्ध झाल्या तारका   राजेश मेकेवाड  

शिग्रथा हवी आम्हाला अन्यायाची पेरणी नाही

Image
 शिग्रथा हवी आम्हाला   अन्यायाची पेरणी नाही  अरे नराधमांनो  कुठे आहात तुम्ही  हिजड्यांनो कुठे  आहात तुम्ही  सनातनी धर्म चाहत्यांनो  कुठे आहात तुम्ही  पांचाळीचे वस्त्रहरण झाले  चुप्पी होते  धनुर्धारी  धावून आला सभेमध्ये  माय बहिण ठेचताना  का आजच्या श्रीकृष्णाने  विकून खाली लाच सारी      डोहाळी तुमची का बांगडी जड झाली होती   कळा विकुन खाल्ल्या  का वांझ झाली होती    का कोनी हाष्य मांडले होते  का तुम्ही दृश्य पाहत होते  त्या लंकेला जाळुन ऐनारे  कुठे खपले होते बजरंग दल  नको आहे दमलेली   म्हातारी संसद सिघ्रता हवी आम्हाला  अन्यायाची पेरणी नाही राजेश मेकेवाड

नाळ

Image
नाळ बंडखोरांना प्रेमळ म्हटलो    मानसांना विद्रोही  दगडाला शेंदूर फासून  कसायाला देव म्हटलो मी गाईला माय  माईला म्हातारी म्हटलं  माझ्या तरुणपणाला   चिरस्थायी म्हटलं मी  गाय कापणाऱ्याला ब्राम्हण त्या ब्राह्मणाला देव म्हटलं मी   माणुसकीच्या वाटेवरती  जख्मांना अंवशीक समजलो मी  गिधाडी टवळ्यांना  सदाबहार समजलो मी  शेतकऱ्याच्या पिळवणुकीला  सत्ताधीशाची नाळ समजलो मी  राजेश मेकेवाड 

_ अंगार

Image
_  अंगार जीवा फार     सोसवेना गार  नव अंगार         झेलते भार  तुम्हा राखुनी  ठेवलीया  धार  रात उरी   लागली चमकदार  आला पांघरूण  जरीचा तार  घायाळ ला  उजेडात  अंधार  बानातुन सुटलेला  धनुर्धार  स्थिरावरु  कसा  मखमलदार  अंग   लुट लय उमलत नार   कमल पाती कळी  रुजणार   अमावस्ये  चांदणं  टिमटिमनार   आयुष्य अमृताची फुलणार            _ राजेश मेकेवाड   

दोनी हात सुखी ठेव

Image
दोनी हात सुखी ठेव कमळभाती गुलाब हाती दोन्ही साथी सुखी ठेव  दुःखाचा डोंगर ओढायाचा  अजन्म त्याला सु:खी ठेव  वृंदावनात शोभणाऱ्या तुळसीला पाणी घालाया   पावित्र्यता त्याची कायम  दारोदारी सु:खी ठेव  सु:खी ठेव हातावर ती  दान माझ्या  देन्यासाठी दोन्ही हात  सदैव सु:खी ठेव  जोडा घरात माझ्या  विठ्ठल रखुमाईच्या    सेवेत माझी दोन हात निरंत सुखी ठेव     सुखी ठेव हातावरती   दान माझ्या  देण्यासाठी दोन्ही हात  सदैव सु:खी ठेव  ओभड धोबड रानाची या  हिरवळ नारी हात सुखी ठेव सुखी ठेव त्या शेतकऱ्याची  दोनी हात सुखी ठेव  राजेश मेकेवाड

ऋतू असा कसा

Image
 ऋतू असा कसा  शोभते का असे तुला  तु काळ कडकडणारा  आषाढ गेला असा तसा श्रावण असुन रडायला  आवळ तुझा शोकांत  पुरे झाला आता  याला त्याला सांगून  रडू नकोस आता  ज्वलंत तुझी काया किती कोमल तू केला  गेले सोडून तुला जाऊ दे ते  कुठे तुझा हिशेब राहीला   प्रेमाचे ते बहाणे झाले  किती काचे तू डोके फोडले  लहान मोठे कळले तुला  पाखराचे तू हाल केला  मीही असाच तुझ्यासारखा  ये जरा जवळ बस  जर थोडे शांत झाले  ते बरे नव्हे का वेड्या  लोक म्हणून राहिले   श्रावण असुन संतापलेला  परी का पागला सारखे  स्वतःचे हाल करून टाकला   राजेश मेकेवाड 

फक्त देव माझी सुखी राहु दे

Image
 फक्त देव माझी सुखी राहु दे सारे जन्म तुझ्या कुशीत राहुदे  जन्मोजन्मी माझ्या च मायेची  उब निरंतर तुझ्या उदरी असो दे  नको श्रीमंतीचे लेणे मजला  पिढ्यानपिढ्या आई वडीलांची  सोबतीला ऊब अजन्म खेळू दे  नको आसेचा बाजार माझा   फक्त देव माझी सुखी राहु दे  राजेश मेकेवाड 

मि का वन वन असावा

Image
मि का वन वन असावा  चाफा हवा  का मोगरा दरवळ हवा का  सहवास तुला  फुलांचा गुच्छ का  पाखरांचा थवा  मिठीत माझ्या का  जिव फरार असावा   यातनांचा पुर का  प्रेमाचा पाऊस हवा  सोबतीला मी का  जिवनी वन वन असावा  राजेश मेकेवाड 

मराठी माझी

Image
मराठी माझी ओल्या  केसातून   चाफा चौफेरला    सुवासित मोगरा   दरवळला इथे  डोळ्यावरच्या कोरीव लेणीत   अजींठा वेरुळ सामावला   श्रींगार  तसा  ठसत  अजन्म जिवंत राहिला  पिढ्यानपिढ्या पाहत राहिल्या दऱ्या खोऱ्यात    नवजात मराठीचा  ढाल तलवारीचा  प्रणय उभा राहिला  रायगडा शिवबा राजा  सोबती खेळला  शिळं घालते मराठी  सह्याद्रीचा कण कण  अन् मराठीचा बाणा   तन मन आम्हा फडकला  राजेश मेकेवाड 

ऐ जिंदगी

Image
  ऐ जिंदगी  हर मोड बना कर   चल मेरे साथ  हर खुशी  डाव पे लगा के  चल मेरे साथ  धुंडना चाहता हुं   जिसे  राहो मे खडा हो  ऐ मौत  हर गम बिछाकर  चल मेरे साथ राजेश मेकेवाड 

कुठे शुभ्र फडकत आहे

Image
कुठे शुभ्र फडकत आहे  दगडाला शेंदूर लावला   मला रंगाची भीती झाली  काल निळा फडकत होता  तिथे आज भगवा फडकत आहे  कोणाला ठावे उद्या कोणता  रंग उधळनार  आहे  या बे रंग जीवनाचा  कोणता रंग खेळणार आहे  कळ्यांची दरवळ  झाडांची हिरवळ  नभासी निळाई  अंधारलेल्या मनामध्ये  कुठे शुभ्र फडकत आहे  राजेश मेकेवाड 

जोडा अंधार उजेडाचा

Image
जोडा अंधार उजेडाचा  बिनजोड्याची पाखर ही कुठे च दिसली नाही  माझी जोडी अजुन कुठेच मला दिसली नाही  पाखरा विना कुठे चिकारली उभी हिरवळ  माझी हिरवळ मला अजून कुठे भेटली  नाही  जोडी बैलाची झुंजार  जगण्याशी  झुंज होती  गेला जोडा निघुन ज्याचा त्याला विचारुन बघा  कोनाच्या दावनीला कोन हिरवळ घालतो त्याला  तुझयासाठी   सामर्थ्याची परी सोबती असो  कोण विच्यारतो त्याला  कोन भेटतो त्याला  जोड्यालाच जपली जाते ओढ सारथ्याची   कुठे चमचमती एकटी सोबतीला तारकाच्या  सारी रात उभी असते पापण्याच्या सोबतीला  जोडा अंधार उजेडाचा कोन मागे कोण पुढे  एक झाला का कुठे कधी एकटा दिसला का  राजेश मेकेवाड 

मृत्यू मला जिवंत हवा

Image
 मृत्यू मला जिवंत हवा  मृत्यू मला जिवंत हवा  हवा  जिव्हाळा तीचा  एकांतलेल्या दिशा वर   एकटा फक्त मी असावा लागले आयुष्य वाटेवरती  उशीर झाला सावल्याला   जवळून माणसे  गेली निघून  परक्याचा   जिव्हाळा राहीला  चिंता यातना भय नको   फुलावरती रेंगाळ नको  नको आहे नाजूक कळ्यांची काया  नको आहे पाखरांचा  गळखा  घासुन घासुन या देहाची   चिता  सारुन ठेवली अर्धी  त्या लेकरा साठी माझी  जड झाली आता  सांगाडी  बानांच्या त्या क्षयावरती  गंगापुत्र भीष्म सांगतो  कोमल  काया अर्जुनाची  प्रिय माझ्या अनुज हाती  हीच  पिढी जातकाची   रुढी अपरंपार तेची  नको मृत्यू शयावरती उभा   मृत्यू मला जिवंत हवा   राजेश मेकेवाड 

मनस्वी _ कविता

Image
 मनस्वी _  कविता  लावलेल्या अत्तराचा  क्षणभर येतो गंध   माती होऊन माझं    उधळत राहत मन  उभे आयुष्य जाते  चंदनाचे गंधाळन्यासाठी    त्याचा त्याला भेटतो  का कधी कुठे सुगंध  आभाळागत खळबळ  दाटलेल्या मेघासी  का झाकते चांदण्याची  लुक लुक नारी रात्र  चहुर  ली मानसाची  पैशाची भरून थैली  रिकाम्या जिवनाची  का चौकारली मनस्वी  राजेश मेकेवाड 

किंचाळनारे द्रष सार

Image
 किंचाळनारे द्रष सार ओळखीची वाट   तीच्या विना सुनी  पैंजणासी  हुका चूक  का पावलांना झाली सोडून गेली हिरवळ  उडून गेली पाखर  ति झाडाची बहर  जवळुन गेली दुर   गुरी ढोरी कुठे गेली  कुठे गेली वासरे  खदखदनारा माळ  कुठे बांधली घरटे त्यान चिव चिव चिमण्यांची   पहाडावर ची ओढ कुठे हरवली मानसे  किंचाळ नारे द्रष सार  राजेश मेकेवाड