Posts

Showing posts with the label रात्र रुसली _ कविता

घायाळ झाडी _ कविता

Image
घायाळ झाडी _ कविता चिंब सरीची  भुलती   परी  सांग मनाशी  तू साजणी  मोर तुरी  हि बागवानी  भुर भुर ही    हिरवळ नारी  उरी उगवली   नव चांदणी  छन छनते   पाय कोवळी   रात चालते  वाट वेडी  मनी वितळली   ही चापकळी  पसरली फुलांची  घायाळ झाडी  रंगीन पाखराच्या   गुरफटते नागमोडी   राजेश मेकेवाड 

रात्र रुसली _ कविता

Image
 रात्र रुसली _  कविता  दुष्काळी सावटी  सापडले  रान  काळीने कापला पिकाचा गळा  कोसळता काळीवर कर्ज फुलले  चिंतनात आज रात्र रुसली  . कणाकणात बांधून संसार  सदैव खेळतो संघर्षात जीवन  संकटात संकट जाते हात धुवून  क्षणात रुसते रात्र माझ्यावर . पिटा  मिठाची रांगोळी भरून  भूक चुरली  काटवटीत कोरडी  भुक म्हणून झोपता बाळ  पाहून त्यास रात्र रुसली . थकले जिवण ह्या भुकेच्या पाठ  मजुरी मोलाची मिळेना कुठ  मुलासाठी अहो रात्र करती कष्ट  रोजदारीच्या शोधात रुसते हो रात्र  रोजच्या वेदना रोज विसरूनी  माय बापाने घ्यावे वाटुनी  घरासाठी काडी काडी जमवता  घरटे ही रूसते रात्र पाहुनी . राजेश मेकेवाड