घडव तू

 घडव तू 


सदैव खेळतो संघर्षात जीवन 
कधीं न सांगता प्रेयसीला 
घडलो फक्त तिच्यामुळे 
मनामनी प्रेम सांगताना 


हरवले डोळे तुझ्याच वाटेवरती 
पापण्या पिकल्या एकाच चेहऱ्यावरती 
वाटेलाच माहित तुझ्या पावलाचे पाठ 
शोधात गेले सारे माझे बालपण 


तुझेही सजावे माझे ही फुलावे 
वाऱ्याच्या धुंदीत साऱ्याला सांगावे 
कधी न सांगता तुलाही 
मुके शब्द थोडे माझे कळावे 


वाऱ्यालाही दिसू नकोस 
मनाला ही छळवू नकोस 
लपून छपून ये ना संग 
ठोक्यालाही सांगू नकोस 


घडवायचे तेवढे घडवून जावे 
कधी कोणाला न सांगावे 
हृदयाच्या भावना मनाला सांगून 
प्रेमातून सर्वांना घडवून जावे 


.... राजेश मेकेवाड 

RAJESH mekewad


Comments

Popular posts from this blog

पंचतत्व कविता

त्याशी राखा चक्रधर

कवी ठसणारी - कविता