शब्द नसते तर

 शब्द नसते तर 


पापन्यात तुझ्या मी लपलो नस्तो
प्रेमाच्या शब्दात सापडलो नस्तो
फासे जर नस्ते तुझ्या हातामध्ये
जिवनाच्या खेळात पहिला आलोच नस्तो


खेळ प्रेमाचा जर झालाच नसता 
गंध घेऊन राज सुकलाच नस्ता
माझेच मन मोहिले नस्ते कुणी
सुंदरीच माझ्या प्रेमात नस्ती कुनी 


तुझ्या पावला मागे आलोच नस्तो
अपयशाचे ओझे घेतलोच नस्तो
तुझ्या इशाऱ्यावर मी गेलो नस्तो
यशाच्या अनंत शिखरावर बसलोच  नस्तो 


अश्रूत तुझ्या मी शिरलो नस्तो 
माझ्या दुःखांचा आनंद घेतलोच नस्तो
वेदनेचे पाठ ह्रदयात सजलेच नस्ते
पापन्यातून तुझ्या निसटलोच नस्तो 


                .....   राजेश मेकेवाड 


राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi