Posts

Showing posts with the label मज होऊ दे _ कविता

तू कशाला _ कविता

Image
  तू कशाला _ कविता तुला तुझीच ओढ  अन माझी साथ कशाला.  एकांत जरी उरला  तुझी दहशत कशाला.  घार झाला माझाच जीव  तुझी शिकार कशाला.  वाट तुझीच शोधत गेलो  तुझ्या जंगलात कशाला .  उसळत गेलो नदीसारखा   स्थिर तुझा काट कशाला .  वणव्यात गेले आयुष्य माझे  वरती अश्रू तुझे कशाला.  नशा चढली भलतीच  तुझ्या साठी वेगळी नशा कशाला.  अत्तरातून वेगळा झालो  फुलांची संगत आता कशाला .  गंध गेला दाहीदिशा  ती दिशा आता कशाला.  उरलो जरी गर्दित एकटा  सोबतीला तु कशाला. तुझ्या पालखीला हात माझा माझ्या अंत्ययात्रेत तू कशाला  कवि. रा.भा.मेकेवाड  

मज होऊ दे _ कविता

Image
 मज होऊ दे _ कविता  मोगऱ्यात घुमुनी मज ,  मोगरा होऊ दे  गुलाबात घुमुनी ,  मज गुलाब होऊ दे  चाफ्यात घुमुनी , मज  चाफा  होऊ दे  घुमता घुमता तेथेच , मज  वळण येऊ दे   मातीत झिजता ,  मज मातीच होऊ दे  परकीयाचे  दुःख जाणुनी  , मज वेदना घेऊ दे  संघर्षात लढुनी  , मज अमर होऊ दे   एका  युगाचा मज  ,  स्वुवर्ण  होऊ दे  अश्रूच्या सागरात  , मज एकट्यास  राहू दे  बुडत्यास सुखाचा  , एक किनारा देऊ दे  नाव घेता वैरी याचे  , तव संकट टळू दे  मदतीचा एक ,  मज हात होऊ दे   वेदनेचा  एकल मी  , उभा जळू दे  त्या सर्वाच्या जीवनी  , आनंद वाटू दे  मज डोळ्यांमध्ये ,  गंगा यमुना नाचू दे  ओठावरती हास्य त्याच्या  , सतत रांगु  दे  जिंकूनीया मी  सारे ,  त्याचेच  राहू दे  मज शया  वरती पाहून ,  सारे शत्रू हसू दे  राजेश मेकेवाड