Posts

Showing posts with the label कोण कुणाची

सावली _ कविता

Image
सावली _ कविता   ठोक्यात धग धग  धाव तुझी  आकाश ओले विरून जाते  पाऊस मनाचा बेभान  तो  ठोक्यात गुणगुण साथ तुझी  ओझे जिव्हाळी  साठवू किती  जरा सांग मनी माझ्या सावर आता  ठेच मनाची वाहू  कुठवर   शोधू कसा मी माझ्यात  आता    राजेश मेकेवाड 

स्वप्ने सजावी - कविता

Image
 स्वप्ने सजावी    _ कविता  भविष्य उद्याचे   आजच घडवू  आनंदमय युगाच्या  प्रकाशात खेळू    स्वार्थी मनाचा   विनास करुनी   युगाच्या ही युद्धाला   प्रेमाने जिंकू    सर्वाच्या हृदयाला  फुलवून ठेवू   स्वप्ने आपुली  महात्म्यांत पाहू    मदतीचे आम्ही  पोलादी वृक्ष बनू   एकतेची मिळून   गोड फळे  चाखू    दिव्य प्रकाशात   राष्ट्र भव्य उभारू   विश्वात माझ्या   धर्म अहिंसेचा वाढो  शुभ्र आकाशात   मन  निर्मळ उधळू   आनंदमय युगाच्या   प्रकाशात खेळू    राजेश मेकेवाड 

कोण कुणाची - कविता

Image
कोण कुणाची  या देहाची या युगाची   कुठे जुळावी बेरीज माझी   सतजन्माचे गत जन्माचे   कुणा कळले देह कोणाचे  कोण रक्ताची कोण आपुली   कुणा कळली खांदी कुणाची  कोण रुसला कोण हसला   कुणा कळली कोण कुणाची   राजेश मेकेवाड