Posts

Showing posts with the label चिंब पावसात

वृक्ष वल्ली सोबती वाढवू

Image
वृक्ष वल्ली सोबती वाढवू   येथे होती सौंदर्याची शाल  गेली कोणत्या वाऱ्यावर  साऱ्याचे येथे होते माहेर  ओसाडले सारे माळरान  येथे मधुर संगीताची शाळा  पक्षाच्या चोची मधील गोडवा  झुळझुळणाऱ्या झऱ्याची ओढ  वाऱ्यात हळुवार छळते कोकिळा  फुला फळांनी लवंडते झाडे  चाखून फळे लावणी गंध  हळद लावूणी  नटती  पाखर ती छेळणारी  हळूच मेघ   पिकास आमुच्या मिळेल  सारे  पाऊस थंडी ऊन कोवळे   निसर्ग देतो सर्वांना धडा   पुन्हा कधी ती भरेल शाळा  नव्या वर्षाची नव्या वृक्षाची  करू लावणी  रंगू वृक्ष यान  नैसर्गि  सोंग निसर्गात करू  हेच वर्ष पुन्हा मिळेल आयुष्यात   सर्वांनी सूत्रे हाती घेऊनी  वृक्षारोपणी  मान वाढवू  येता काळ दूर करू  वृक्ष वल्ली  सोबती वाढु राजेश मेकेवाड 

सोबती साठी व्याकुळलो _ कविता

Image
 सोबती साठी व्याकुळलो  जगाला शोधण्याचे  आरशात सामर्थ्य कुठे माणसात माणसाला  शोधण्याचे सामर्थ्य कुठे  मन मनात मारतो     कुठे दार त्याचे खुले  बाहेरच्या जगाशी  मी  कुठे प्रेमाने नाते मांडलो   काट्यावरती वावरणाऱ्या  संगतीचा तिरस्कार त्या   मि एकटा जड झालो  गरिबीला कुठे दार खुले    पडद्यावरती रंगणाऱ्या  माणसातला   माणूस कुठे  सोबती साठी व्याकुळलो    समानतेचे गनित   कुठे  राजेश मेकेवाड   

चिंब पावसात

Image
 चिंब पावसात  कोणी या पावसाचा  पदर ओढला  इंद्रधनुची मी या   कोर मागतो  श्रावणात मेघ ओले  थेंब लाजते  पावसात भिजण्याचे   भान बेभानते  डोळभर पाणी   मनात भरुनी  थुई थुई नाचती   मोरणीची मंद  मंद मंद वाऱ्याची   वेगळीच ओढ  ओढते जीवाला  या मोरनी ची कोर  गंध ओल्या मातीचा   मृगजळी भास  भासते जीवात  डोलणारी पीस   पसरली मनात   चांदण्याची रात   रात वेगळीच   चिंब पावसात   राजेश मेकेवाड