Posts

Showing posts with the label ओढ _ कविता

भारतेची ज्वालामुखी _ कविता

Image
 भारतेची ज्वालामुखी   रंग इंद्र धनुष्याचे   सप्तरंग गुण ज्ञान   भारतीचे पाखरे ही    घरटे एक धनुर्धार  सुख शांती प्रेम धागा  चाफा जाई जुई गंध   गुंफवितो चहू  दिशा   रेंगाळतो एक गुच्छ  अमृताचे   झेलूनिया   बंदुकीचे पुष्पहार   वंदन  त्या वीरांना  कोटी कोटी अमरत्व   तन  मन धरतीचे   लढतो उपवासी  दिग्विजयाची गाथा  शत्रूच्या ललकार मी वाटा संत महात्म्याच्या वाटी   दुःख वेदना फुलती   माया धरतीची वाहुनी  लाल लाल झाली    रणांगणाची विरांगणा   स्वातंत्र्याच्या तीरावरती  ललकारते हक्कासाठी  भारतेची ज्वालामुखी   राजेश मेकेवाड 

दैत्याची ही सावली - कविता

Image
 दैत्याची ही सावली  सत्य बोला पांडुरंगा   दिल त्यास काय   हरला तो काळ्या माती   ढेकळाचा माऊली    झोपडीत जणू त्याच्या   तुझ्या पावलाची पाठ   भक्ती भाव जुनाट  रंगतात बाल रूप    लुटेऱ्याचे पोट मोठे   खाऊनीया   घेतले ते   विठ्ठलाची मूर्ती त्या   राबुनिया उपवासी  निसर्गाच्या    घावामधली   फाटकीच त्याची झोळी   पाठीशीही  उभे त्याच्या   दैत्याची ही सावली  राजेश मेकेवाड 

ओठावर केसर - कविता

Image
 ओठावर केसर रोज रातची   स्वप्ने माझी   पंख दिशा दिशा   तुझ मागते    खेळते मखमली डोळ्यामध्ये  दिव्य नजरेची  चमक तुझी तोरण   आरसा तुझ्या रूपाचा   या युगाचा तू सुर   रात खेळते  पाण्यावरचा जाळ  चांदणे कवेत  माझ्या   सख्या  लावते रात   तुझा जीव गुणकार   मी  गुण केसर   ठेवते  ओठावर  राजेश मेकेवाड 

व्याकुळ _ कविता

Image
 व्याकुळ   _  कविता  क्षण भुंगुरल्या जीवात   डोळ्यात जरासी घेना  अश्रूची माझ्या होळी   सुटल्या ह्या पापण्या    रंग लाल केसरी ओठा मध्ये  गालेवरची गुलाब पाकळी   कळीत तुझ्या भिरभिरते  जीव या पाखराचा फिरते    मी वेडा खुळा ग प्रेमी  चाले तुझ्याच चाले वरती   तू एक माझी नशा नशेती  रोमांच नाचते अंगावरती  जाता मज पाहुनी तू दूर  कधी न जाता काळजाच्या   तुझ्या विना न दुरल्या वाटा  व्याकुळल्या  ह्या सावल्या माझ्या   राजेश मेकेवाड 

ओढ तुझी _ कविता

Image
 ओढ तुझी  _  कविता  माझ्या प्रीतीचा चंद्र  आज दूर कसा झाला  रुसलाय सूर्य तुझा  रात्रभर जागला    पोर्णिमेच्या प्रकाशात  अंधार कसा झाला   प्रेम ग्रहणात तुझ्या   माझा जीव कसा आला   राजेश मेकेवाड 

ओढ _ कविता

Image
  ओढ _  कविता मनाला या ओढ   तशी चंद्राची कोर   माझ्या डोळ्याला लागे   तिच्या कोरेची काजळ   पाहूनी या ते डोळे   झाकले आकाश   जिथे तिथे झाले   ते चांदण्याचे रूप   भर भरून नभात   ओजंळीचा हात   सर   तृप्त तहानेची  भर  भरते जीवनात   उमलते सुखाचे   कोवळ्या कळ्यात   नवरंग पाखराचे   जीव जडते तुझ्यात     गंध    प्रेमाचा   फुलू   दे  हृदयी  तुझ्या रोमा रोमात   भिडू दे मला भी   हसऱ्या जीवाला  मोगऱ्याची साथ   फुलते पहाटे   तुझे गोड चित्र   राजेश मेकेवाड