शेतकऱ्याची लूठ व अवस्था

शेतकऱ्याची लूठ व अवस्था


 दोन वर्षाचा उन्हाळा         झाले शिवार मोकळे

मी राबतो उन्हात             घाम टिपते रानात

सूर्याशी झेलून पाठीशी           मी हआकतओ नांगुर

दुरुन पाहतो सावली           वखर चालते उन्हात

उन्हाळ्याच्या दिवसात        राब राब रानात

घोट घेऊन पाण्याचा      मशागत करतो रानाची

घोट घोट पिऊन पाणी     दिवस झापतो घामात

माझ्या घामातून येते      उभ्या पिकाचा गंध

या घामाची रे चव      सर्व फळाची या गोडी


श्रावण महिन्यात       येथे पावसाच्या सरा 

सर्व परीवाराचा      आनंदात शेतात मेळावा

बीज घेऊन हाती      भरावी लक्ष्मीची ओठी

हिरवळले बोलके डोलके     पिक नांदते दिवास्वप्नात 


बीजा फुटले अंकुर      वर आकाश मोकळे

अंकुराचे शिषू रोप      वर तारुण्य सूर्य प्रकाश

बंद डोळे दिपते      सूर्य ओकताना आग 

उन्हात बाल रोप        तडफडते अंगावर

कसे पहावे डोळे भरून        म्हणून पहातो वर 

कोठे दिसना गाजा वाजा    कशी मिटवू तहान

रोप कोसळता खाली      नाही डोळ्यातही पाणी


आता कोठून भरू      मझ काळीची ओठी

घरी नाही खाया आता      भाकरीच दान

जमीन देऊ आबा , बाबा , तात्यास     मंग मिळेल दान

आता करू रात दिवस मंजुरी      मंग मिळेल भाकर

कोठे करावे मंजुरी         बळच जावे कामास

कोणी देईना बर पैक       कसे जगाव मंग जिवन 

शेतकरी मजूर वर्ग       मेला काम करण्यात 

सत्ता धीश जगत आहेत        भष्टाचाराच्या घशात


कसा घातला घाला       काळोखाच्या पाय दारी

पाळण्याच्या कोवळ्या पाई     उभा राहिला सत्ताधारी

केव्हा येईल राज शेतकऱ्याचं      कोपराला गुळ लावते बळच

आता या निवडणुकीत       तुम्हा दावतो लाकडी नांगर


            .... राजेश मेकेवाड 

Rajesh Mekewad


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi