Posts

Showing posts with the label पानावलो - कविता

तू कशाला _ कविता

Image
  तू कशाला _ कविता तुला तुझीच ओढ  अन माझी साथ कशाला.  एकांत जरी उरला  तुझी दहशत कशाला.  घार झाला माझाच जीव  तुझी शिकार कशाला.  वाट तुझीच शोधत गेलो  तुझ्या जंगलात कशाला .  उसळत गेलो नदीसारखा   स्थिर तुझा काट कशाला .  वणव्यात गेले आयुष्य माझे  वरती अश्रू तुझे कशाला.  नशा चढली भलतीच  तुझ्या साठी वेगळी नशा कशाला.  अत्तरातून वेगळा झालो  फुलांची संगत आता कशाला .  गंध गेला दाहीदिशा  ती दिशा आता कशाला.  उरलो जरी गर्दित एकटा  सोबतीला तु कशाला. तुझ्या पालखीला हात माझा माझ्या अंत्ययात्रेत तू कशाला  कवि. रा.भा.मेकेवाड  

पानावलो - कविता

Image
 पानावलो    _  कविता राबणाऱ्या खुरट्या झुडपांना  मी कधी तोडले नाही   कष्टाळू काट्याला   टाचे खाली घेतलो नाही    मुंगी सारखा चेंगरत  असताना   काटा असूनही  उगीच   कोणाला टोचलो नाही  तापून तापून रानावरती  कोरडा झालो   मी मातीसारखा   मनात भेगाळलो नाही  भुकेल्यास घास भरवतो   कधी कधी  उगीच स्वार्थासाठी देवाला  प्रार्थना करीत नाही  मी रोज धेव्हाऱ्यात  संध्याकाळी दिवा लावतो  कोणता भडवा माझा  अंधार हटवत नाही   पाखराच्या झोपड्याला   कुठे छेडलो नाही  कुणाच्या घरट्यात बसून  कोनाचे वासे मोजलो नाही  चवीत कुणाच्या खारट झालो  मी अत्तर झालो नाही  घुमत बसलो पंगती पंगती  कुठे दरवळत गेलो नाही    राबून राबून रानामध्ये  घामावलो असेल  मी कोण्या डोळ्याला  पानावलो नाही    मी कोण्या डोळ्याला  पानावलो नाही       राजेश मेकेवाड.