Posts

Showing posts with the label आमचा घास _ कविता

निरोप _ कविता

Image
 निरोप  _ कविता माझ्या अपुऱ्या शब्दांमध्ये   थोडा  तुझा  भाव ठेवतो  कळत नकळत या जगाला  मि माझा तुला  निरोप देतो   चालून चालून ऊसवलेल्या    निळ्या नभासी  हात माझा   दुर दुर चे  पुसुन   चांदणे   ओघळणारे  अश्रू  टाचतो   अशांततेचा बांध मोकळा  तुला थोडे मागने  घालतो  हातावर ती मोजन्या इतपत  मि माझे सामर्थ्य ठेवतो  कितेक पावसाळी उरात माझ्या  तुझ्या साठी ओंजळी भरतो  छळवनारे नाव कोवळे  जिवनी माझ्या पर्ण फोडतो   राजेश मेकेवाड

वृक्ष वल्ली सोबती वाढवू

Image
वृक्ष वल्ली सोबती वाढवू   येथे होती सौंदर्याची शाल  गेली कोणत्या वाऱ्यावर  साऱ्याचे येथे होते माहेर  ओसाडले सारे माळरान  येथे मधुर संगीताची शाळा  पक्षाच्या चोची मधील गोडवा  झुळझुळणाऱ्या झऱ्याची ओढ  वाऱ्यात हळुवार छळते कोकिळा  फुला फळांनी लवंडते झाडे  चाखून फळे लावणी गंध  हळद लावूणी  नटती  पाखर ती छेळणारी  हळूच मेघ   पिकास आमुच्या मिळेल  सारे  पाऊस थंडी ऊन कोवळे   निसर्ग देतो सर्वांना धडा   पुन्हा कधी ती भरेल शाळा  नव्या वर्षाची नव्या वृक्षाची  करू लावणी  रंगू वृक्ष यान  नैसर्गि  सोंग निसर्गात करू  हेच वर्ष पुन्हा मिळेल आयुष्यात   सर्वांनी सूत्रे हाती घेऊनी  वृक्षारोपणी  मान वाढवू  येता काळ दूर करू  वृक्ष वल्ली  सोबती वाढु राजेश मेकेवाड 

सावल्या तुझ्यातल्या _ कविता

Image
 सावल्या तुझ्यातल्या _ कविता   सावल्या आयुष्याच्या  हळव्याशा   सारथी   जुळल्या मनाशी मनाला  अवकाशी दिशा मधूनी    असो नसो कोणी कुठे   प्रेम भरावे पापण्यात  अश्रू माझ्या जिव्हाळ्याचे  भेटतात मज क्षणभर  अशा  कशा  सर्व दिशा   दिसते आज तुझ्या मध्ये   तहानलेल्या कंठाला ही   ओढ मिळावी तुझ्या मध्ये  पहाटतील स्वप्ने कधी  तुझ्यातले सर्व  माझे  काळोखाच्या मध्ये रात्री  रंगतील का तुझ्या सोबती  वेदनेचे रंजन मोठे  हास्य ठेवले ओठावरती   अपयशाच्या जिन्याला ही  पंख फुटावे यशासाठी   स्वप्नाला बहार मोठी  पदरात पडावे फळ ती  गोडी आपुल्या  नात्याची   संधी दाठुदे रसाळी   राजेश मेकेवाड 

गाठ _ कविता

Image
 गाठ _ कविता  रसाळ प्रीत अंधारी   स्नेह ललित सावळ   केसरी ओल्या आकाशी  भाळते  साजरी पाखर   मधाळ लाजऱ्या   फुलांची   किलबिल सांज रेंगाळी    मृग नयनी उराशी    छेळते  तार विरहाची   दव कोवळी मोत्यांची   ठुमक मंद वाऱ्याची      कवटाळलेले स्वप्न उमलते   कमळ कळीची पाती   कंटाळ धुकी  जगण्यातली   पहारलेल्या   सांज वेळी   नटतथटत रोज नव्याने    पूर्व दिसे गाठ माझी  राजेश मेकेवाड 

कधी कधी _ कविता

Image
कधी कधी _ कविता  कधी लाजते कधी रुसव्या मनात कधी गोड बोलते  कधी गोडवा पुसते  कधी स्तुती माझी कधी खट्याळ बोलते कधी दानवीर कधी भिकारी सांगते  कधी जीवलगा  कधी  वैऱ्यात ठसवते  कधी भेटते  कधी अर्ध्यात सोडते  कधी कळ्यात  कधी दगडात  पाहते  कधी डोळ्यात मूर्ति  कधी आरसा पुसते   कधी पावसात  ते  वेडावते वारे  मिठीत  पापण्यांच्या   कधी व्याकुळ असते  राजेश मेकेवाड 

गर्भ गळिताचा _ कविता

Image
 गर्भ गळिताचा _ कविता  ती का नव्याने   मज पुन्हा पाहते  मी अंधार एक  ती प्रकाश मागते  पाप गर्भातला मी   ती जीवदान मागते  माझे हात  अपुरे   ती दान मागते  माझ्या स्वप्नभंग प्रेमाचे  हाती रंगवले  रक्त रांगोळ्यात  मी सुखात पाहिले  दरवळ फुलाची  मी चेंगरून हाती   कधी कळ्यास    मी न फुलवून पाहिले   मी गर्भगळीथाचा    होऊनिया  वैरी  इवल्या इवल्या पावलाची  माझी अंगण सुनी    मज हाती दान मोठे काय   कन्यारत्न  एक नाही  सावलीचा शोध आशा    देह फाटकाच राही  राजेश मेकेवाड 

शेतकऱ्याच्या मुला

Image
  शेतकऱ्याच्या मुला   परंपरा आम्ही केले शेती   त्या शेतात काही नाही  धरू नको रे नाजूक हाती  वंशी नांगरी रुंभनी  आज्ञानाच्या काळोखाला  जन्म नको देऊ त्याला  तेजोमय ज्ञानधारा  पळव सर्व अंधाराला  ज्ञान भूक लागो तुला  अज्ञान परिस्थिती जाय  जरा   ज्ञान  अनादी शिक  दे  सर्वांसाठी लढा  दे   तेच बुद्धीचा नको स्वार्थी  तुझ्या विना पाहणार नाही  ज्ञान सूर्य उद्याचा उगव    तेजोमय  घे काळोखात  कळ्यात गंध नको दारिद्र्याचा  ज्ञान प्रकाश झोपड्यात फुलावा   विश्वात अनुभव व्यापकतेचा  विनाश धनाच्या लालसेचा  होशील अनमोल दागिना तू  शेतकऱ्याच्या शिकून मुला  जग पोशिंद्वयावर  सोडशील का   एक काळ सुखाच्या लळा  राजेश मेकेवाड 

कोण ती काळी

Image
 कोण   ती   काळी  जात विचारतो आसवांची   तहान मीठवते म्हणूनी    लागलीच नस्ती  कधी मला  वीष पाजवले नस्ते कोणी  तिलाच का अमृत पाजवतो  आठवणीच्या गाभ्यात ठेवुनी   भूक जाणवते अमृताची  घास भरून जाते विषारी  डोळ्यांमध्ये प्राण तगमगते  समोर तिलाच का पाहुणी   अश्रुच्याही  वेदना सांगतात  माझ्यासाठी वीष सांभाळूनी   वीष दिले सर्वदा तिने  भुकेपोटी पिऊन घेतले  मरण तीथे  रमले माझे   जगणे कुठे राहिले मोठे   कोणी असो विषारी दिसते   सांगताना का हरवून जाते  माय असावी पुत्र तिचा  मित्र सखा का प्रेमी असावा   राजेश मेकेवाड 

वेदनेत _ कविता

Image
 वेदनेत _ कविता  माझ्या ह्या मोगऱ्याला   आज काय झाले   फुलणाऱ्या पाकळ्यांची   गंध कसी  हरली  माझ्या ह्या सागराला  आज काय झाले  लाठेवरच्या रांगोळ्यात  दुःख कसे भरले   हसणाऱ्या बागेला  आज काय झाले   पहाताच माझ्याकडे  पाणी फडफडले   उडणाऱ्या पाखराला  आज काय झाले  झेप आकाशी    पंख कसे तुटले   लाजऱ्या वेलीचे  आज काय झाले  सावल्याच्या   आडोशाला  आज कसे दडले    कोकिळेच्या कंठाला   आज काय झाले   ओठात  सुर घेता   शब्द कसे रुसले  माझ्या   ह्या प्रेमिकेला  आज काय झाले  वेदनेच्या गुच्छात  एकटी दरवळले   राजेश मेकेवाड ३०/१२/१६

आठवणीची पूजा करतो मी

Image
 आठवणीची पूजा करतो मी  चुकलेस तू माझ्या वाटा  मी चुकलेल्यास वाटा देत आहे  सोडलेस मला अर्ध्यात तू   मी अर्ध्यातल्याला हात देत आहे  अश्रू   तुझ्या नावाचे साठवीत   रडणाऱ्यास मी हसवीत आहे  तू दिलेल्या मला वेदनेत  मी सर्वाच्या वेदनेवर  औषध देत आहे  जास्तच रागावतेस कधी माझ्यावर  सर्वांसहीत  तुझ्यावर ही तेवढेच प्रेम  तू दिलेल्या शब्दात विष मला   मी विषाऱ्यास आता  अमृत देत आहे    रात्र रात्र जागवली आठवणीत तुझ्या   मी  जागणाऱ्यास    झुलवत आहे   दिवसाच्या येणाऱ्या अपयशात मला  मी सूर्यच  यशाने भरून उगवित आहे   विसरलेस तू तुझ्या खऱ्या प्रेमिला   मी प्रत्येकाच्या वैऱ्यासोबती   आहे   परके केलेस तू तुझ्याच नात्याला  मी परक्यासही आपुलकिले   आहे  वगळलेस तू माझ्या नावाला  तुझ्या शब्दाची ही पूजा करीत आहे   विसरलेस पेटलेल्या झाडाच्या सावल्याला   मी आजही त्यात जळत आहे   राजेश मेकेवाड 

आमचा घास _ कविता

Image
 आमचा घास _ कविता  कोण देतो कोण भावना ओळखतो   शब्दांना कुठेतरी तुम्ही चित्र पाहतो   विचित्र दिसला की अनोळखी सोंग घेतो  देव तर कुठे फाटक्यांना विचारतो  दगडांना खूप काही दान देतो  माणुसकीला विद्रोहाचा शेंदूर पुसून  सरकारी बांधिलकीची श्रीमंत तुम्ही  गरिबांना कधी कुठे मोकळे सोडतो  शेतकऱ्याची कसरत भावल्यांचा खेळ वाटतो  सर्वाचं पोट भरवतो त्याच  हातावरती धरतो  भुकेमुळे झाला कुठे अपघात जेथे  शेतकरीच प्रथम मृत्यू  मुखात सापडतो  देव देवता नेच केला हो आमचा घात  सरकारचा कसा पोहोचेल तो हात  बुद्धी जीवांचे चालते इथे  प्रशासन  ओठावर एकाच्या पोटात एकाच्या    बांधून देतो हो आम्ही आमचाच घास   बांधून देतो हो आम्ही आमचाच घास     राजेश मेकेवाड