Posts

Showing posts with the label गर्भ गळिताचा _ कविता

अबोली जीवनाचे _ कवीता

Image
अबोली जीवनाचे _ कवीता   अबोली शब्द तिचे  कधी बोलकी होतील का  हृदयाची धगधग  कोणाच्या हृदयाला कळतील का   दुःख झरण्याचा अंत   सुख सागरासारखा होईल का  कोणाच्या लेखनीने   कुणाच्या अंतता सूर्यास्त होईल का  न पाहिलेले रूप कुणाचे  डोळ्यात तसे रंगतील का  एका अंत हृदयाचा   कुणाच्या स्पंदनी  फडकेल का    सतत शीत प्रकाशाचा  कुठे पेटून दीप उजळेल का  अंधार स्वतः खाली ठेवूनी   कोणी दिव्यासारखे जळेल का   तिच्या जीवाची धावपळ  कुणाच्या दारात संपेल का  चिघळत्या जखमेवर कोणी  वेळेस औषध देईल का   सतत चिंता मणी तिच्या  कोणाच्या मनी  भेटेल का  खळखळणाऱ्या वेदनेचा जीव  कोण्या जीवनाच्या काठी थांबेल का  रा.भा.मेकेवाड .

गर्भ गळिताचा _ कविता

Image
 गर्भ गळिताचा _ कविता  ती का नव्याने   मज पुन्हा पाहते  मी अंधार एक  ती प्रकाश मागते  पाप गर्भातला मी   ती जीवदान मागते  माझे हात  अपुरे   ती दान मागते  माझ्या स्वप्नभंग प्रेमाचे  हाती रंगवले  रक्त रांगोळ्यात  मी सुखात पाहिले  दरवळ फुलाची  मी चेंगरून हाती   कधी कळ्यास    मी न फुलवून पाहिले   मी गर्भगळीथाचा    होऊनिया  वैरी  इवल्या इवल्या पावलाची  माझी अंगण सुनी    मज हाती दान मोठे काय   कन्यारत्न  एक नाही  सावलीचा शोध आशा    देह फाटकाच राही  राजेश मेकेवाड