उन्हाळलेला माळ तुझा सारिका

उन्हाळलेला माळ तुझा सारिका 


कोण माझे ठाव नाही 

या हृदयाला दार नाही 

भेटे अजून कोणी अवकळीचा 

पाऊस त्याचा भानात नाही 


काळजाला टिचले माझ्या 

टाके दोर निर्बंध नाही 

अजून कोणाच्या भावनेला 

मी कुंपण केले नाही 


मी हृदयाला माझ्या 

दार लावलो नाही

येणाऱ्याचे स्वागत अन्  

जाणाऱ्याला बंध नाही 


चंद सुखाचे पहाते सारेच 

मी दुःख वेचता दमलो नाही 

काटा होऊनी चालणे माझे 

फुल होणे जमले नाही 


मधमाशांचा तो गुंजावा 

फुला सहित अलवार कळ्याचा  

चौफेर  सारा गंध पसरत 

बागी झेंडूच्या तो मोगरा असावा 


मनात माझ्या दरवळणारा 

ओघळणारा पाझर होता

तुझ्या साठी खळखळ नारा 

उन्हाळलेला  हा माळ होता 

                       सारिका ...


... राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड प्रेम कविता






Comments

Popular posts from this blog

पंचतत्व कविता

त्याशी राखा चक्रधर

कवी ठसणारी - कविता