Posts

Showing posts with the label वांझ सरकार _ कविता

वांझ सरकार _ कविता

Image
 वांझ सरकार  _  कविता  कोणी चंद्र पाहिला हाती  कोणी सूर्य घेतला मिठी  मी भाकरीचा तुकड्या पायी  मरण टाळलं किती  मी कोरड्या अडात टाकला  भरून फुटका पवरा  डोळ्यात साचला तेव्हाच  आता सरकार कोरडा कुठे राहिला   न सुटला हात ढेकळाचा   न दाटला कधी गंध घामाचा  उजळून लावले सारे  जाळला तो अंधार कुणाचा  मी परक्याला लावला हात  हात परकाच राहिला  देतो दान क्षणो क्षण  लबाड झाली काळी माता  आम्हा साऱ्या शेतकऱ्याचं  भाशिंग मोठ्या मनाचं   बी बियाणं खात औषध   पेरतो बेमाप पैशात  आम्हा कापसाचा वावरात  पिकलं  वांझ सरकार  लागला हाती घेऊन पुन्हा   रुभंण  जन्मताच वाकड  ओठी  गेली रानावना   गवऱ्या उन्हात वेचताना   पोटी  बाळ असूनही  गेली रास माझी पुरात तेंव्हा   ....  राजेश मेकेवाड  17/05/2020