Posts

Showing posts with the label कोरोनाचे एक काळ झाले

सावली _ कविता

Image
सावली _ कविता   ठोक्यात धग धग  धाव तुझी  आकाश ओले विरून जाते  पाऊस मनाचा बेभान  तो  ठोक्यात गुणगुण साथ तुझी  ओझे जिव्हाळी  साठवू किती  जरा सांग मनी माझ्या सावर आता  ठेच मनाची वाहू  कुठवर   शोधू कसा मी माझ्यात  आता    राजेश मेकेवाड 

कवी जळत होता - कविता

Image
 कवी जळत होता सहज तुझी आठवण आली  त्यात माझी काहीच  चूक नव्हती  दारावरचा रस्ता तुडवीत होतो  तसे काम वाटेवरचेच काहीतरी  . तू लावलेला तुझ्या अंगणातला दिवा  वाऱ्यात डगमगत जळत होता  कामात तू एवढे गुंतलेस की  हाताचा आडोसा मागित होता . तुला प्रकाशात ठेवण्यासाठी  उभे आयुष्य जळत होते  या समाजाच्या छेडछाळामध्ये  जगण्यासाठीच हात मागित होता . खरे काय अन खोटे काय  तुलान मलाच माहीत होते  तू अशी ज्योत लावलेस की  माझेच स्वप्ने जळत होते . तू लावलेला सौभाग्याचा दिवा  का राहिला अंधारात उभा  पापण्यातून गळते त्याच्या  तुझ्या कुंकवाचा ओलावा  . तू कधी ह्याच्या कधी त्याच्या तर कधी सर्वाच्या  आयुष्यभर प्रकाशात राहिलीस  तो दिवा काहीच मागित नव्हता   त्यात मात्र हा कवी जळत होता    त्यात मात्र हा कवी जळत होता . राजेश मेकेवाड 

हव हवस झाड - कविता

Image
 हव हवस झाड  ऊन वारा पाऊस थंडी  सार काही गेलं असतं  तरी मला चांगलं होतं मात्र ते झाड हव हवस होतं . कमरेतून लचकणारी फांदी   पाहून खेळणारे पान   नटलेल्या फुलातला गंध  फुलपाखराचा त्या रंग  सार काही गेलं असतं तरी चांगलंच होतं   मात्र ते झाड हवं हवंस होतं  . पाखरांचा चिवचिवाट भिरभिर नाऱ्या पंखाची साथ फांदीतून निसटलेला हात   मिठीत घेतलेली ती वाट . सार काही गेल  असतं तरी चांगलंच होतं  मात्र ते झाड हवं हवस होतं  डोळे भरून पाहिलेले रूप   स्वप्नातून बांधलेले घर  व्याकुळतेने घेतलेली  पिल्लांच्या चोचीतली चोच    सार काही गेलं असतं तरीही मला चांगलंच होतं   मात्र ते झाड हवं हवं होतं . रोजच्या पाडातला रस  खाताना झालेले लाल ओठ  रुतलेल्या गोडीतली जीभ  जपलेल्या जिभेवरची चव    सार काही गेलं असतं तरी चांगलंच होतं  मात्र ते झाड हवाहवास होतं    त्या उन्हाळ्यातला गारवा   हिवाळ्यातली गर्मी ती   पावसाचा लपलेला आडोसा   उन्हात पडणारा पाऊस    सार काही गेलं असतं तरी चांगलाच होतो  मला ते झाड हवं हवं होतं  सारं काही गेलं असतं   तरी मला चांगलं होतं   मात्र त्या अंगणातलं झाड   का हवं हवस वाटत होतं ? राजेश मेकेवाड

पंचतत्व कविता

Image
 पंचतत्व  अनादी अनंत आद्य अविनाशा  निर्विघ्न तोही विधाता माझ्या नित्य व्यक्त सर्व साक्षी सर्व  कर्ता  ज्ञानमय आनंत  स्वंयप्रकाशी सर्वव्यापक  कर्म    ;   धर्म  ;   विधी  ;    विखो ; परित्यजौनि   परमेश्वरास शरन रिगाओ   धन  ,  मोह   ,    आप्त्ताचे प्रेम ,   सर्वसंग परित्याग समाधान पावो  विवेक युक्त भावरूप अविस्मरणीय ठरावे   श्री दत्त दत्त  , स्मृती रूपाने रंगवावे   श्री गोविंद प्रभू मूर्ती पासौनि प्रकाशू   गगनवात्सल्य अंतरी गर्भ पतीत दवंडने    कडकडीत विरागी , अमृत्यू  नैष्ठिक   सर्वभूती सम दृष्टी , अवतार चक्रधारी  गरुडगामी मधुसूदना चक्रेश्वरा   विश्वबाहू   चक्रपाणी  सृष्टीपालीणी  तोची केशवा यशोदेच्या लल्ला   अनंत रूपाय सहस्रजित  रुपेश्वराय   इह एक पद द्वी पद  ब्रम्हांड सारा   पंच अवतारी , पंचतत्व सदा सुखदा   राजेश मेकेवाड

पानावलो - कविता

Image
 पानावलो    _  कविता राबणाऱ्या खुरट्या झुडपांना  मी कधी तोडले नाही   कष्टाळू काट्याला   टाचे खाली घेतलो नाही    मुंगी सारखा चेंगरत  असताना   काटा असूनही  उगीच   कोणाला टोचलो नाही  तापून तापून रानावरती  कोरडा झालो   मी मातीसारखा   मनात भेगाळलो नाही  भुकेल्यास घास भरवतो   कधी कधी  उगीच स्वार्थासाठी देवाला  प्रार्थना करीत नाही  मी रोज धेव्हाऱ्यात  संध्याकाळी दिवा लावतो  कोणता भडवा माझा  अंधार हटवत नाही   पाखराच्या झोपड्याला   कुठे छेडलो नाही  कुणाच्या घरट्यात बसून  कोनाचे वासे मोजलो नाही  चवीत कुणाच्या खारट झालो  मी अत्तर झालो नाही  घुमत बसलो पंगती पंगती  कुठे दरवळत गेलो नाही    राबून राबून रानामध्ये  घामावलो असेल  मी कोण्या डोळ्याला  पानावलो नाही    मी कोण्या डोळ्याला  पानावलो नाही       राजेश मेकेवाड. 

सकय _ कविता

Image
सकय _ कविता  गंध परी  जीव तुझा   कुरवाळ पाखरा   फुल मोगरा   रंग बावरी  बांदा सावळी   मनी झाकल्या  नयन बोलकी  ताल हळवी   छळती लव्हाळी    नदी काठच्या  बगळ्या परी   खेळ खेळते   पान मासोळी  जीव झरना  पंख कोळी.     कमळ पाणी  पाती कोवळी  कधी ईवला  स्पर्श सोबती   हसून सांगे   नजर होली   भेट कसी  सकय सोबती   राजेश मेकेवाड 

अंधार लागला हाती

Image
 अंधार लागला हाती .   चंद्रमुखी चेहरा तुझा   पडद्यात झाकला किती   पापण्याच्या चाँद कोरी   प्रीत उमल कोवळी   पणती पाई  ठाव  दिव्याचा   अंधार समई खाली  साथ तुझी ही वाटेवरची  वीर ते सावली    पाखराची पंख कोवळी   घरट्यास तुझी  चाहुली   चोच  तुझी ही सांजवेळी   ओढ  काळजावरी    हात हातून सुटला कधी   पाण्यावरची भातुकली     गंधा पायी घूम घालते   फुलावरची फुलपाखळी .   राणी जवळी येना  अंधार लागला हाती     राजेश मेकेवाड 

राजकारणी - कविता

Image
राजकारणी - कविता    खोटे मोडून दावले   सत्य खोडुन दावले   पाहिले घूरुन मला   मी काळे डाग दावले .   सारेच होते बेगडी   पडद्यास पुसून दावले   गुराळ तुमचे लावलेले   कोपराला गुळ लावले .   कित्येक घरचे बाप   नसेल गळावर चढले   दाबून तुम्ही तेथेच   घरटे जाळुन टाकले .    एका एका मतासाठी   करते डबल वाटले   एक एक मत बाटलीत   तुम्ही  बुडून काढले .    कित्येक मत वाचले   तुमच्या घाणिरड्या  कृत्यात    कितेक घरचे एक एक मत  कायमचे गेले .  किड्या  मुंग्याचं जगणं  टांगत्या शिक्यावरती   लटकून ठेवलेलं तुम्ही   तुमच्या फक्त हितासाठी .    राबणारे हात उटले हितासाठी   तेच बोट पुन्हा फिरले आमच्यावरती .  राजेश मेकेवाड

माय _ कविता

Image
माझी पहिली गुरु माय माय पावसाचा हात   माये सुखाची साथ   अबोली भावनाची  मायबोलकी  सावली  कोवळ्या झाडाची  माय कोवळी  पाकळी  कोवळ्या कळ्यात माय  फुला परी दिसणारे   दिव्याच्या ज्योतीवर   माय घर तेवनारी    पेलणार माझं दुःख   माय अंधारात जळणारी  बाळापरी  झिजनारी   माय  मध  मधमाशी   लेकराच्या पोटासाठी   माय उपवासी फिरणारी  तानुल्याच्या ओठावर  माया तुझं नाव मोठं  घोटभर दुधामध्ये  माय जग जिंकणारी  राजेश मेकेवाड

तोल - कविता

Image
 तोल - कविता नजर टाकली मी   जगताना एकट्यात   तुझ्या फाटक्या सावल्यांची   झुलणारी  तारांबळ  प्रेम मनोर   उन्हात नाचणारा  तुझ्यासाठी   हुंदकावणारा मोर भटक्या आभाळ निळ्या सरींचे   गर्द दाटले डोळ्यात   भेटलेले तुझे पापण्याला   ओलावते अजून भास   निखळ जगण्यातले   तुझ्या सारथ्याला    तोल तुझा चालताना   पुरेल माझ्या सामर्थ्याला       राजेश मेकेवाड

अनोळखी chha - कविता

Image
 अनोळखी  chha - कविता  जीवन माझे थोडे    उरले वरचे वजा घे  जमला टाका धागा दोर   नव्या हाताचे शिवण दे  उधार तुझा आधार दे   थोडे माझे जगणे घे   बोल मुक्या काळजाचे   स्पंदनात कधी पसरून घे  गळवळीचा पाऊस मोठा  दरवळीचा गंध घे  तुझ पापण्याला अंतराचे  मज डोळ्याला हुंदके दे   भिर भिरणारी चोच चातकी  जमले थोडे पाणी दे   पाठ प्रीतीचा खळखळणारा   तुझं काळजाला झरणे  दे  जमले कधी तुझं काळजाला  पिळ घालने पाकळ्याला   रंगीन फुले वेली वरती   पंख पसरू दे पाखराला   राजेश मेकेवाड 

उतार - कविता

Image
उतार -  कविता  बोल माझे जरी अडखळले   वाट तुझी का अडखळावी   पापण्यांमध्ये    साचलेल्या   प्रश्नाची उत्तरे  सर  करावी अनोळखी बहरल्या फुलांची   पाखराला   स्पर्शून   घ्यावी   पडद्यावरती नव्या जीवनाची   सांगता संगत रंगीन करावी  साचलेल्या भावनांची   बाहुली बोलकी असावी   चालताना हातामध्ये   पावलांना उतार द्यावी       राजेश मेकेवाड 

मराठमोळ्या शाही मधले _ कविता

Image
मराठमोळ्या शाही मधले  _ कविता स्पर्श होता अत्तरासी , मज चंदनाचा भास अंतरी  उधळलेल्या गंध सरीचा   मझ  कवेत भास आकाशाचा दाही दिशेत पाखरांचा  स्वच्छंद  विहार  लेला  मझ अंतरी लागलेला   गंध पसारलेल्या फुलांचा      ललकारते  या चित्र  कवीचे   लेखनीचे बाण छेदूनी   रणांगणातूनी   माय बोलते   मराठमोळ्या शाही मधले    राजेश  मेकेवाड 

कोरोनाचे एक काळ झाले _ कविता

Image
  कोरोनाचे एक काळ झाले     रक्ताळलेले बिंब सारे  थैमानलेल्या पावलांची   इवल्या इवल्या कोवळ वाटा   किंचाळ णाऱ्या बाळाची  विस्कळलेल्या घरट्या पायी    हंबरणाऱ्या        गाईची  दाटलेल्या  माळ  कपारी   सांडलेली रक्ताळशाही  रंगीन गावो गाव  साऱ्या  प्रेथांच्या रांगोळी   लिहू कसा मी काळजावरती  थैमानलेल्या घावाची  काळजा विन सुने सुने   जवळलेल्या जगाची   मंगळ चंद्र आपलाच झाला   ब्रम्हांडातल्या  विश्व  तार्‍यासी    मानवंदना करू कुणाची   संपत्तीच्या सुटल्या मुठी   हातामध्ये जीव धरुनी   पळत्या झाल्या मानव जाती  कोरी भूमी कुठेच नाही   जळत्या चिता विजतील कधी   न जात नाही ना धर्म नाही   जपला जीव जगण्या पायी   न घर सुने शिवार सारा   कोल्ह्या  परी हाल झाले   बोल सारे मुके झाले   शब्द आले ते काळ झाले  शब्द आले ते काळ झाल    राजेश मेकेवाड