Posts

Showing posts with the label प्रश्न तर आता खरा गंभीर झाला होता श्रद्धा

पाऊलवाटा _ कविता

Image
पाऊलवाटा अजुन काय हवे तूला   जाता जाता सांग मला  स्वप्नांचे झाले पाचोळे   तरिही  दरवळेन एकदा  परतुन पाहण्यात माझ्या  दिशा हिन झाल्या वाटा   न सांगता हळूच गेला  एवढा माझा काय गुन्हा  वेदनेचा बाजार माझा  रंगला भलताच वेगळा  सरून जाव्या तश्याच माझ्या  तुझ्या सोबती पाऊलवाटा  राजेश मेकेवाड   

प्रश्न तर आता खरा गंभीर झाला होता श्रद्धा

Image
  प्रश्न तर आता खरा गंभीर झाला होता त्या राधेचं त्या मिरेच प्रेम होतं की नाही   त्याच्याही पुढे कोणी हट्ट केला नाही  माझ्या घराच्या स्वाभिमानावरती  मी रक्ताळलेला डाग लावला होता .   माय बापाच्या दोन जीवा मधल्या काळजाचा एक तुकडा  लाडक्या तुकड्याचे 35 विछाद लेले तुकडे  मी निवडलेल्या स्वैच्छिक  तुकड्याने केले होते    आईच्या काळजाचा आणि तडफडणाऱ्या बापाचा शोध भटकत  होता जिथे तिथे  ढसा ढसा रडत होता    माझ्या अस्तित्वाचा प्रश्न  आता कुठे शिल्लक होता  दिसत होत्या मला माझ्यासारख्या  अजून कितेक श्रद्धा  मी ऐकले नाही  हा प्रश्न तेव्हाच संपून गेला होता भेडसावत होता मला माझ्या सारख्या कित्येक जनीच्या हट्टाचा  प्रश्न तर आता खरा गंभीर झाला होता .  प्रश्न तर आता खरा गंभीर झाला होता . ममतेचा , करूनेचा  ,  अस्मितेचा , आनंदतेचा ,  जिव्हाळा , स्वाभिमानाचा    स्वच्छंद  , भेटतो  बापाच्या मोडक्या तुटक्या घरट्यात .  बाहेरच्या रचलेल्या काळोखात   मी कशी टिकणार   दुष्टायचे कटकारस्थान   तुला कसे दिसणार      श्रद्धा  तुला कसे कळणार ?     श्रद्धा - राजेश मेकेवाड