दु:खाचा गुच्छ

 दु:खाचा गुच्छ 


कुठे शोधू तुम्हास 
मी , माय बाप 
आज सूर्य भी चिंब 
झाला इथं 


चांदण्या भी शिंपी 
अश्रू प्रकाश 
आज काळोख चंद्रात 
दिसे फक्त कोर 


पापण्याच्या पिंजऱ्यात 
बांध मुला अश्व 
नाही पदर मायेचा 
तुझे पुसणार डोळ 


चहुदिशाचे संकट 
नाही पेलनार बाप 
घरटे सोडून गेले 
ते दोन चिव चिव 


आज पंखानाही बळ 
आले शोधात 
वृक्षा खाली छाया पडे 
फळ त्याच्या सावलीत 


नाजूक डोळ्यांमध्ये 
अश्रू आज टोचतात 
मनामध्ये ध्यास तोच 
आज जीवनाच्या वाटेवर 


चालण्याच्या धुंदीमध्ये 
सुख उधळून जाई 
जगताना आठवण 
दुःखाचेही गुच्छ देई 


... राजेश मेकेवाड 

RAJESH mekewad



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi