झुंज ते मराठी - कविता

 झुंज ते मराठी _   कविता 


मन तुझे दिसते मला 
त्या वाऱ्यावर जाताना  
आह तुझी तडफडते  
आपुलेच   पंख तुटताना .  


काड्या काड्या  गुंफुनीया 
शब्दात आपूले शोधताना 
 घरटेही बांधलेस तू   
परक्यासी झुंज खेळताना .


 चांदण्याच्या पुजंक्यावर 
 झोके तुझ्या स्वप्नाची 
 आम्ही मायेसी  परके झालो 
 रसाळ मोह शब्दा  मधुनी .  



गतवैभव  अवतरावे 
ओव्या  मधुनी  रममान 
 शब्द ओसांडून फुलावे  
गंध रेंगाळत मराठी  . 


संत  झऱ्याचा जन्म झाला 
गोदाचे शांती विराट 
 सह्याद्री कवच घालूनी 
 मराठी झुंजते  रणांगणात  .

राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi