Posts

Showing posts with the label तारुण्यात जळते

राजकारणी - कविता

Image
राजकारणी - कविता    खोटे मोडून दावले   सत्य खोडुन दावले   पाहिले घूरुन मला   मी काळे डाग दावले .   सारेच होते बेगडी   पडद्यास पुसून दावले   गुराळ तुमचे लावलेले   कोपराला गुळ लावले .   कित्येक घरचे बाप   नसेल गळावर चढले   दाबून तुम्ही तेथेच   घरटे जाळुन टाकले .    एका एका मतासाठी   करते डबल वाटले   एक एक मत बाटलीत   तुम्ही  बुडून काढले .    कित्येक मत वाचले   तुमच्या घाणिरड्या  कृत्यात    कितेक घरचे एक एक मत  कायमचे गेले .  किड्या  मुंग्याचं जगणं  टांगत्या शिक्यावरती   लटकून ठेवलेलं तुम्ही   तुमच्या फक्त हितासाठी .    राबणारे हात उटले हितासाठी   तेच बोट पुन्हा फिरले आमच्यावरती .  राजेश मेकेवाड

कोरोनाचे एक काळ झाले _ कविता

Image
  कोरोनाचे एक काळ झाले     रक्ताळलेले बिंब सारे  थैमानलेल्या पावलांची   इवल्या इवल्या कोवळ वाटा   किंचाळ णाऱ्या बाळाची  विस्कळलेल्या घरट्या पायी    हंबरणाऱ्या        गाईची  दाटलेल्या  माळ  कपारी   सांडलेली रक्ताळशाही  रंगीन गावो गाव  साऱ्या  प्रेथांच्या रांगोळी   लिहू कसा मी काळजावरती  थैमानलेल्या घावाची  काळजा विन सुने सुने   जवळलेल्या जगाची   मंगळ चंद्र आपलाच झाला   ब्रम्हांडातल्या  विश्व  तार्‍यासी    मानवंदना करू कुणाची   संपत्तीच्या सुटल्या मुठी   हातामध्ये जीव धरुनी   पळत्या झाल्या मानव जाती  कोरी भूमी कुठेच नाही   जळत्या चिता विजतील कधी   न जात नाही ना धर्म नाही   जपला जीव जगण्या पायी   न घर सुने शिवार सारा   कोल्ह्या  परी हाल झाले   बोल सारे मुके झाले   शब्द आले ते काळ झाले  शब्द आले ते काळ झाल    राजेश मेकेवाड

तू अशी छळतेस मला कविता

Image
 तु अशी छेळतेस मला  तू अशी छळतेस मला  आकाशातला तुटलेला तारा  वाऱ्याच्या तोलातला  झुलता प्रीतीचा मनोरा  तु अशी छळतेस मला  पावसाळा प्रिय चातकाला  दव  मोत्यासारखी  तुझी  लपतात अजुन पात्याला  तु अशी छळतेस मला मी चंद्र काळोखातला  जनु दिव्य किरणाची  प्रकाशाची चंद्र कोर मजला  तु   अशी   छळतेस  मला  हृदयात आठवणीचा रेत झरा   जगन्याला  ओलावा   तुझा  जणु वाळुवरचा  मासा     राजेश मेकेवाड

तारुण्यात जळते - कविता

Image
 तारुण्यात जळते माया पोटी थेंबा थेंबाने माती झाली ओली  बाप प्रीतीच्या खोंबातली रत्न दाटते भूवरी      कष्ट आमुचे दैव हाती परक्याच्या त्या वाटी घशामधला घास आमुच्या  कधी  काळीच्या त्या पोटी  हातावरती येऊन रडते  माझ्या घामातली माती   अमृताचा वाटेकरी तू  वीस का तुझ्याच वाटी  पाऊस वारा सूर्य धरा   या सर्वाचा तू वैरी   हातावरचे धुवून जाते   कधी तारुण्यात जळते    कधी तारुण्यात जळते   राजेश मेकेवाड