Posts

Showing posts with the label विद्रोह _ कविता

विद्रोह _ कविता

Image
 विद्रोह  _  कविता   माणसे   प्रेमाचा  का विद्रोह करतात  दोन पाखराची प्रीत  फुलासारखी दूर करतात  गंध येतो पाकळ्यात   तेव्हा रंग वेगळा होत नाही   हसऱ्या फुलासाठी मग माणसे   काटे जपून का ठेवतात  जेव्हा जेव्हा फुल मधुरतात   तेव्हाच पाखरे घुमतात   फुलपाखरा  साठीच तर  कळ्या नटून बसतात  गरज नाऱ्या पावसात   वारे सोसाट वाहतात  माणसे गरजून थोडेच   वारे पाणी वेगळी करतात    डगडणार्‍या पावसात   ढग थोडीच वेगळी होतात  अशाने   पाकळ्यामध्येच  पाखर दडून बसतात    समाजाचा छळछाड   विजेसारखा तीव्र नसतो    मोहरण्याच्या काळात   माणसे माणसांना छळवतात    पानाच्या आडोशात काटे  सारखेच टपून बसतात  फुले तर फक्त वरती  पाखरासाठीच फुलतात  मोसमात सारेच रंग येतात  पिवळ्या पाखराच्या शोधात  सारेच का घुम घालतात  तेथेही कुणाचा का विद्रोह करतात  राजेश मेकेवाड