Posts

Showing posts with the label राजकारणी - कविता

मी तुमच्या सारखाच वाटलो

Image
 मी तुमच्या सारखाच वाटलो  देवाला देव वाटलो   सज्जनाला सजन वाटलो   भिकाऱ्याला भिकारी तर  राजाला राजाच वाटलो    परक्याला परका  असुरांना असुर    क्रूर तेला क्रूर तर माणसाला माणूस वाटलो मी   दगडांना दगड   मित्रांना मित्र  शत्रूला शत्रू  आपल्याला आपुलकीचा वाटलो    आंधळ्याला आंधळा   मुख्याला मुका  बहिऱ्याला बहिरा   सजीवांना सजीव वाटलो  मुंग्यांना मुंगी   हाती ला हाती   कोल्ह्यांना कोल्हा तर वाघाला वाघ वाटलो  मुलांना मुलगा   पित्याला पिता  विद्यार्थ्याला विद्यार्थी   माईला ममत्त्व वाटलो  वेड्याला वेडा   शहाण्याला शहाणा  गुन्हेगाराला गुन्हेगार   गुरुला गुरुवर्य वाटलो  ज्याला जसा वाटलो  त्याला तसा तसा वाटत राहिलो मी ...  राजेश मेकेवाड 

राजकारणी - कविता

Image
राजकारणी - कविता    खोटे मोडून दावले   सत्य खोडुन दावले   पाहिले घूरुन मला   मी काळे डाग दावले .   सारेच होते बेगडी   पडद्यास पुसून दावले   गुराळ तुमचे लावलेले   कोपराला गुळ लावले .   कित्येक घरचे बाप   नसेल गळावर चढले   दाबून तुम्ही तेथेच   घरटे जाळुन टाकले .    एका एका मतासाठी   करते डबल वाटले   एक एक मत बाटलीत   तुम्ही  बुडून काढले .    कित्येक मत वाचले   तुमच्या घाणिरड्या  कृत्यात    कितेक घरचे एक एक मत  कायमचे गेले .  किड्या  मुंग्याचं जगणं  टांगत्या शिक्यावरती   लटकून ठेवलेलं तुम्ही   तुमच्या फक्त हितासाठी .    राबणारे हात उटले हितासाठी   तेच बोट पुन्हा फिरले आमच्यावरती .  राजेश मेकेवाड