Posts

Showing posts with the label तुझी आठवण

सोबती साठी व्याकुळलो _ कविता

Image
 सोबती साठी व्याकुळलो  जगाला शोधण्याचे  आरशात सामर्थ्य कुठे माणसात माणसाला  शोधण्याचे सामर्थ्य कुठे  मन मनात मारतो     कुठे दार त्याचे खुले  बाहेरच्या जगाशी  मी  कुठे प्रेमाने नाते मांडलो   काट्यावरती वावरणाऱ्या  संगतीचा तिरस्कार त्या   मि एकटा जड झालो  गरिबीला कुठे दार खुले    पडद्यावरती रंगणाऱ्या  माणसातला   माणूस कुठे  सोबती साठी व्याकुळलो    समानतेचे गनित   कुठे  राजेश मेकेवाड   

तुझी आठवण - कविता

Image
 तुझी आठवण  निखळ तुझ्या आठवणीची  सत प्रत दे मला मिठी माझी अन तुझी  विसरू नकोस मरणाला   माझ्या शुभ्र कफणात   उचलून लोक पाहतील  असे चित्र तुझे न माझे  वलय ही मातीला विसरतील    शृंगार थोडा घालून  झालीस आता सत्वशील   अंगार माझा घेऊन   माझेच सत्य पळून   तो नैऋत्य मानसून होता   कड कडून भेटलीस तेव्हा   मतलई वाऱ्याची खळबळ   तुझा कोरडाच गडगडात आता   ते कोवळेच होते झरे   वाहुन झाला धबधबा   जोम वाऱ्याची वादळी  लाट  गार झाला श्रावण आता    ती बेभान लहरी पाखरे  भेदून गेली काळजाला  पुन्हा झोंबतो का तो कारवा  पाहून   त्या   पाखराला  राजेश मेकेवाड