Posts

Showing posts with the label अनोळखी

निरोप _ कविता

Image
 निरोप  _ कविता माझ्या अपुऱ्या शब्दांमध्ये   थोडा  तुझा  भाव ठेवतो  कळत नकळत या जगाला  मि माझा तुला  निरोप देतो   चालून चालून ऊसवलेल्या    निळ्या नभासी  हात माझा   दुर दुर चे  पुसुन   चांदणे   ओघळणारे  अश्रू  टाचतो   अशांततेचा बांध मोकळा  तुला थोडे मागने  घालतो  हातावर ती मोजन्या इतपत  मि माझे सामर्थ्य ठेवतो  कितेक पावसाळी उरात माझ्या  तुझ्या साठी ओंजळी भरतो  छळवनारे नाव कोवळे  जिवनी माझ्या पर्ण फोडतो   राजेश मेकेवाड

जननी _ कविता

Image
 जननी _ कविता   रंग कोण्या कामाचा  गुण लाख मोलाचा  वाऱ्यावर उधळू नका  गंध साऱ्या फुलांचा  अशी आमची शोभते  रान फुली  ही   सारी  वेगवेगळ्या कला मधुनी   झेप घेती फुलपाखरी  आयुष्याचा खेळ न करावा  खेळ कुणाच्या स्वप्नाचा  आपल्याही स्वप्नात सजावे  खेळ मुलीच्या स्वप्नाचा  हे प्रगतीचे पाऊल तुझे  पंख फुटो  दाही  दिसे  नवचैतन्य स्वप्नाची आता  चौफेर   गुलाल वादळी  जागल्या ठसून मनी   कोवळ्या पालवीचे   कीर्तीवंताचे प्राण तुझे  जननी  अभिमान तिचे  राजेश मेकेवाड 

विरांगणी _ कविता

Image
 विरांगणी  _ कविता  पाकळ्या वरती दरवळल्या  आज नव्या युगाच्या पणती   आकाशाला सात जणू  ह्या  इंद्रधनुष्याची  नाजूक हाती रेशीमगाठी   घेऊनी   आस नवेली   माती वरती पाय रोउनी  सितीज लोळन घाली  सावित्रीच्या पाय पुजेने  धन्य   झाली धरती  रिण  तिचे हे कुठे फेडावे  नाजूक तेवत्या  वाती  राजेश मेकेवाड   

विस्कळलेला _ कविता

Image
 विस्कळलेला _  कविता कुठे शोध  माणसाचा    पुसावा  जगाचा आरसा उभा  लागला तू भलताच मागे  पुढचा कोण वळुन पाहतो  तुला  विवष्य झाले  जिवन  माझे  जगणे सारे उधार आहे  बाजार आपला विस्कळलेला   आधार कुठे मांडला  आहे  राजेश मेकेवाड  

पर्ण फुटावे _ कविता

Image
पर्ण फुटावे _ कविता उरात का गडगडते  आभाळ निळ्या सरींचे  दुर दुर चे लहरी वारे  पापण्या वरती धडकते  मी मनाच्या सोडून गाठी   व्हावे  तुझ  सारथी  पावलांना उतार माझ्या   तू लागते मज सोबती  वनवनता  मी चंद्र एकटा   दुर दुर तु  कोण  दिशेला  पर्ण फुटावे हृदयी माझ्या  भास नव त्या पल्लवाचा  राजेश मेकेवाड   

सावल्या तुझ्यातल्या _ कविता

Image
 सावल्या तुझ्यातल्या _ कविता   सावल्या आयुष्याच्या  हळव्याशा   सारथी   जुळल्या मनाशी मनाला  अवकाशी दिशा मधूनी    असो नसो कोणी कुठे   प्रेम भरावे पापण्यात  अश्रू माझ्या जिव्हाळ्याचे  भेटतात मज क्षणभर  अशा  कशा  सर्व दिशा   दिसते आज तुझ्या मध्ये   तहानलेल्या कंठाला ही   ओढ मिळावी तुझ्या मध्ये  पहाटतील स्वप्ने कधी  तुझ्यातले सर्व  माझे  काळोखाच्या मध्ये रात्री  रंगतील का तुझ्या सोबती  वेदनेचे रंजन मोठे  हास्य ठेवले ओठावरती   अपयशाच्या जिन्याला ही  पंख फुटावे यशासाठी   स्वप्नाला बहार मोठी  पदरात पडावे फळ ती  गोडी आपुल्या  नात्याची   संधी दाठुदे रसाळी   राजेश मेकेवाड 

वसंत उधळते _ कविता

Image
  वसंत उधळते _ कविता  तुझ्या अर्जवाचे   मागने हे थोडे  जगावेगळेच मी शोधतो उत्तारे   वेक्त  भावनाचे खेळ मनी रंगते  विरघते   रूपाचे स्पर्श ते कोवळे  ताजे तवान सोसले उरी धरोनी  आस ती  हृदयी क्षणात पसरते  स्पंदनी  अंतरीचा  ध्यास  तूझा   कण  कण  जीव  झुरनी लागते  असोसनारी भाळते  तव तरीही     वेदनेचा  गोड  अंगी ज्वर जळते   उभा नाचणाऱ्या मोरणीचा तुरा  हृदयी  वसंत  उधळते  जीवाचा  राजेश  मेकेवाड 

खेळ भविष्याचा

Image
 खेळ भविष्याचा  नक्षत्राच्या खाली मध्ये  जुंपूनीया झाले काय  पोटासाठी हात पुढे  जगविले   सारे जण   माती मधले किडे आम्ही  झुंज तो कणाकणाशी  कणाकणास  जोडूनिया   पीक सजवतो राणावरी   दुष्काळातील रोपटे आम्ही  मुळा छेद ती  पाषाणी   मिळे हातास आमुच्या  पाझर  जन्मभरी दुःखाचे  आम्ही रानावनाच्या पालव्या  जीव जपलो काठ्यामध्ये  वारसा आमचा परंपार    प्राण काट्याच्या टोकावर  असे कसे अवचित दिसे   झोप चांदण्यात खेळे  भुक विषारी शेतकऱ्याची  पोट भरवतो सर्वाचे म्हणून   भरलेल्या पिकामध्ये  दिसे आमुचे  प्रतिबिंब  चिमणी पाखर आम्ही  पोटाचे मालिक भक्त  राजेश मेकेवाड 

बेगड _ कविता

Image
बेगड   _  कविता बेगड दिसनाऱ्या  या युगात जगण्याला मी काय मागू अंतरीचा  जाळ माझ्या  उगीच वेगळा का होऊ  दाखवून दे  या जगाला   जगासारका  रंग वरवरचा  अंतरीचा कोण पाहतो  तू वेगळा  का दुर्मिळतेचा  शोध नव्याने घेतील लोक   हक्काचा तुझ्या वध करुनी  नह्यात तेत तुझ्या अस्तित्वाचा   उत्तराचा पाटला  करतील सारे मनमोकळ्या मानुसकिचा   शोध घेतील मानव वाटा   जिवंत प्रश्न समोर ठेव   व्यर्थ संच भूतकाळाचा    ...   राजेश मेकेवाड  Rajesh Bhaskar Mekewad 

लहानपणीच्या व्यथा _ कविता

Image
 लहानपणीच्या व्यथा  कुठे गेले रे बालपण   मधमाशासारखे उडून   किती एकांतेत  राहत होतो  पोळी वरती टोळी जपून  मधासहित चाकत होतो   एकमेकांच्या ओठासी  घुमून तेथेच बसत होती  पुन्हा ती रागवलेली मधमाशी  कट्ट्यावरच्या थटा    लागल्या दाही दिशा   आता कोणत्या वाटेवरती  शोधू लहानपणीच्या व्यथा   .... राजेश मेकेवाड 

मोठ्या मनाची वाट _ कविता

Image
 मोठ्या मनाची वाट विरहाची काडी काडी   प्रित वेडे घरटे बांधी  माझी सुगरण राणी  घरटे पहाटे  डोखूणी   मना मनी भासते या   तुझी मला सावली   त्याचं आनंदात राहते   स्वप्न गुंफूनी काडी   फांदी फांदी गणगोत  ओलाव्याची लागे आसं  पाना मधल्या पानालाही   तुझी लागते आस    स्वप्न उभ्या काळजाचे  पंखा विन पसरत  नकळत लागलेली  मोठ्या मनाची वाट  राजेश मेकेवाड 

स्वप्ने सजावी - कविता

Image
 स्वप्ने सजावी    _ कविता  भविष्य उद्याचे   आजच घडवू  आनंदमय युगाच्या  प्रकाशात खेळू    स्वार्थी मनाचा   विनास करुनी   युगाच्या ही युद्धाला   प्रेमाने जिंकू    सर्वाच्या हृदयाला  फुलवून ठेवू   स्वप्ने आपुली  महात्म्यांत पाहू    मदतीचे आम्ही  पोलादी वृक्ष बनू   एकतेची मिळून   गोड फळे  चाखू    दिव्य प्रकाशात   राष्ट्र भव्य उभारू   विश्वात माझ्या   धर्म अहिंसेचा वाढो  शुभ्र आकाशात   मन  निर्मळ उधळू   आनंदमय युगाच्या   प्रकाशात खेळू    राजेश मेकेवाड