Posts

Showing posts with the label सांग समजून त्याला प्रेम कविता

सांग समजून त्याला प्रेम कविता

Image
सांग समजून त्याला   माझे झिर्ण झालेले काळीज  सांग समजून त्याला  अजून तुझा ध्यास सोडत नाही  सांग समजून त्याला  पाना   पाना दडतो  माझा जीव कळ्याचा  सहवास नाही त्याला  आजपर्यंत कोणाचा  सांग समजून त्याला  तुझा चंद्रासारखा चेहरा  अन् चंद्रकोरीव नजरा  अजून विसरत नाही  सांग समजून त्याला  पौर्णिमेच्या दिवशी  डोळे भरून पहावे  इतके सोपे नाही आता  हा चंद्रग्रहणात आहे तरी कोणाच्या  सांग समजून त्याला       .... राजेश मेकेवाड