Posts

Showing posts with the label ओढ अंधार ली _ कविता

ओढ अंधार ली _ कविता

Image
 ओढ अंधार ली   _ कविता  अंधार मिटवाया सारेच येती   ज्योत प्रकाशाची  फुंकून देती   स्त्री  बीजांचा नाश करूनी   वंश दिवा लावू  पाहती     बाल वयात जोडून नाती  सुखविवाहाच्या धाग्यात बांधून  दुःखाची गळा घालून माळ   फूलने कळ्यांचे  विसरून जाती  परक्या धनास शिक्षण दूर  कर्तव्य समजून अर्धेच  ज्ञान   शिक्षण गळतीचा  सिद्धांत मोठा   पावले दूर जाती  शाळेपासून   पती हक्काचा वेसनी  मारा   सतजन्मी संस्कृतीचा ठेवा  अंधारी काळोख जन्म घेऊनी   प्रकाश लुप्त होऊन जाती  मुलगी होऊन मुलीचा द्वेष  ज्योती विना दिव्याची ओढ  अनंत प्रकाश सज्ञान  रूपी   अज्ञानरूपी अंधारी ओढ  राजेश मेकेवाड