Posts

Showing posts with the label माय _ कविता

वांझ सरकार _ कविता

Image
 वांझ सरकार  _  कविता  कोणी चंद्र पाहिला हाती  कोणी सूर्य घेतला मिठी  मी भाकरीचा तुकड्या पायी  मरण टाळलं किती  मी कोरड्या अडात टाकला  भरून फुटका पवरा  डोळ्यात साचला तेव्हाच  आता सरकार कोरडा कुठे राहिला   न सुटला हात ढेकळाचा   न दाटला कधी गंध घामाचा  उजळून लावले सारे  जाळला तो अंधार कुणाचा  मी परक्याला लावला हात  हात परकाच राहिला  देतो दान क्षणो क्षण  लबाड झाली काळी माता  आम्हा साऱ्या शेतकऱ्याचं  भाशिंग मोठ्या मनाचं   बी बियाणं खात औषध   पेरतो बेमाप पैशात  आम्हा कापसाचा वावरात  पिकलं  वांझ सरकार  लागला हाती घेऊन पुन्हा   रुभंण  जन्मताच वाकड  ओठी  गेली रानावना   गवऱ्या उन्हात वेचताना   पोटी  बाळ असूनही  गेली रास माझी पुरात तेंव्हा   ....  राजेश मेकेवाड  17/05/2020 

माय _ कविता

Image
माझी पहिली गुरु माय माय पावसाचा हात   माये सुखाची साथ   अबोली भावनाची  मायबोलकी  सावली  कोवळ्या झाडाची  माय कोवळी  पाकळी  कोवळ्या कळ्यात माय  फुला परी दिसणारे   दिव्याच्या ज्योतीवर   माय घर तेवनारी    पेलणार माझं दुःख   माय अंधारात जळणारी  बाळापरी  झिजनारी   माय  मध  मधमाशी   लेकराच्या पोटासाठी   माय उपवासी फिरणारी  तानुल्याच्या ओठावर  माया तुझं नाव मोठं  घोटभर दुधामध्ये  माय जग जिंकणारी  राजेश मेकेवाड