भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा

 भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा



ज्यानी ज्यानी लवंगी फटाक्याचा सर सोडवून एक एक फटका वाजवला त्या सर्व भाग्यवंताना दिवाळीच्या शुभेच्छा!!


ज्यानी ज्यानी मोती साबणाचे शेवटचे तुकडे संपेपर्यंत तो साबण वापरला त्या काट्कसरी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!


ज्यानी ज्यानी गल्लीतील फुसके फटाके गोळा करून त्यातील दारु काढून मोठा धमाका केला त्या धाडसी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!


 ज्यानी किल्ले बनवताना आरोग्य केंद्रातून सलाइन पाईप आणून पाण्याचे कारंजे बनवले त्या तंत्रज्ञानी लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!


ज्यानी ज्यानी सांडशीचा वापर करून टीकल्या दुसऱ्याच्या पायाजवळ फोडल्या त्या करामती लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा!!


ज्यानी ज्यानी फराळाचे पदार्थ जसे लाडू चकल्या चड्डीच्या खिशात घालून गुपचूपपणे खाल्ले अशा खवय्याना दिवाळीच्या शुभेच्छा!!



*भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा.* 😄😄💐💐💐

शुभेच्छा


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi