Posts

Showing posts with the label कविता

शेतकरी जन्माला येत नाही सरकार

Image
 शेतकरी जन्माला येत नाही सरकार याकडे लक्ष द्या जरा  शेतकरी जन्माला येत नाही सरकार याकडे लक्ष द्या जरा कित्येक वर्ष झाले नोकरदार जन्माला आले क्रांती झाली मात्र शेतकरी जन्माला येत नाही सरकार याकडे लक्ष द्या जरा प्रत्येकाला वाटतो आपला मुलगा आपल्यासारखा झाला पाहिजे आपल्यापेक्षा उच्च पदावर राहिला पाहिजे मात्र शेतकरी जन्माला येत नाही सरकार याकडे लक्ष राहू द्या जरा   सरकारी कोणतीही सेवा असो त्यामध्ये जन्म घालायला तयार असतात कित्येक माय बाप आणि मुली मात्र शेतकरी जन्माला येत नाही सरकार याकडे  लक्ष राहू द्या जरा  स्कूल कॉलेज महाविद्यालयात फक्त कर्मचारी  उदयाला येत असतो सरकार ढेकळामध्ये जन्मलेला हा शेतकरी होत असतो मात्र तुम्ही महाविद्यालय स्कूल कॉलेजमध्ये फक्त कर्मचारी वर्ग जन्माला घालतो शेतकरी जन्माला येत नाही सरकार याकडे  लक्ष राहू द्या जरा  आमच्या मुलाची शर्यत कर्मचारी वर्गाच्या मुलाबरोबर लावली  अशाने आमचे  स्वाभिमान खचले जातील व आम्ही आमच्या पुरतेच कष्ट करतील अशाने शेतकऱ्याचा तरी जन्म कसा होणार सरकार  याकडे जरा लक्ष राहू द्या सरकार  राजेश मेकेवाड

तडफडत _ कविता

Image
तडफडत   कविता   का ग खेळली माझ्यासंग जीवा प्रती  तुझ्या सोबती  विजे  सारखा तुटूनी पडावा   कसा  जीव हा तुझ्यावरती   काळ होऊनी माझ्यावर  घेऊनी गेलीस अर्धे प्राण  तडफडणे हे तुझ्या मध्ये  गुरफडतो अजून तुझा ठाव   डोळ्याच्या तारा भि ह्या तुटेल भरुनी अंधारात  प्रकाशाचा सोडुनी वाटा  भटकते तुझ्या दिशा दिशात  कोणत्या पिंजऱ्यात बांधले मला   काटेच छेदती काळजात   वेदनेच्या गुच्छात खेळतो  हा खेळ किती गोडव्याचा  विसरूनी माझ्या वाटा   तू बांधिल्या तुझ्या दिशा   पेटवूनी हृदयाच्या तठा   तडफडत तुझ्या वाटेत असाव्या   राजेश   मेकेवाड 

मोह माया तुझी हाल _ कविता

Image
 मोह माया तुझी हाल जपून ठेव जरा  शुभ्र मखमली जीवाला   गुलाबी थंडीच्या तडा   पडतील ह्या जीवाला   टिपूर उभे रानात  जशी चांदण्याच्या बनात  नव सिंगार तुझा  हा भार किती छान   उब कोवळी किरणाची   रंग होईल लाल लाल   रत्न जडिताची साल   मनास सतत छळणार   काजळी  कोरा डोळ्याच्या  माझ्याच मला नजरेत   भरून जातो या भरात   जसे माझेच हे रान   नव बंधनी  नात्याच्या  मोह माया  तुझे हाल   हुरड्यात जसी पाखराची   डोळ्यात भरती उभी ज्वारी   राजेश मेकेवाड 

परतून ऐ.ना . कविता

Image
 परतून ऐ . ना  . तू अशी दारात उभी   वळणा विना  टिचल्या पाखराची  प्रीत परतून ऐ .ना .  सांग सखे तुझ्या मना   भेटलेल्या खाना खुणा   अठवून अनोखी भेटून   वाट परतुनी  ऐ.ना .   परक्या पाखराला  हुंदके कळेना  कळते वाट जुनाट  माहेर परतुन ऐ .ना .   टिचला राग मनातला  वाऱ्यात वरवर गेला  आला जरी लडिवार पुन्हा  माणूस परतून ऐ . ना . क्षणोक्षणी भेटेल  तुला   ज्ञानगंगा घरोघर   वेळ तुझी  अनमोलाची  मानुस परतुनी  ऐ . ना .  तो घाव तारुण्याचा  जळतो रोज नव्याने  मनी ठेच लागलेल्या   हाती परतून ऐ . ना .   मी सांगतो काय  अन  कुनास  कळेना   पावलो पावली   ती साथ परतून  ऐ  .  ना . राजेश मेकेवाड 

तुझी आठवण - कविता

Image
 तुझी आठवण  निखळ तुझ्या आठवणीची  सत प्रत दे मला मिठी माझी अन तुझी  विसरू नकोस मरणाला   माझ्या शुभ्र कफणात   उचलून लोक पाहतील  असे चित्र तुझे न माझे  वलय ही मातीला विसरतील    शृंगार थोडा घालून  झालीस आता सत्वशील   अंगार माझा घेऊन   माझेच सत्य पळून   तो नैऋत्य मानसून होता   कड कडून भेटलीस तेव्हा   मतलई वाऱ्याची खळबळ   तुझा कोरडाच गडगडात आता   ते कोवळेच होते झरे   वाहुन झाला धबधबा   जोम वाऱ्याची वादळी  लाट  गार झाला श्रावण आता    ती बेभान लहरी पाखरे  भेदून गेली काळजाला  पुन्हा झोंबतो का तो कारवा  पाहून   त्या   पाखराला  राजेश मेकेवाड 

विद्रोह _ कविता

Image
 विद्रोह  _  कविता   माणसे   प्रेमाचा  का विद्रोह करतात  दोन पाखराची प्रीत  फुलासारखी दूर करतात  गंध येतो पाकळ्यात   तेव्हा रंग वेगळा होत नाही   हसऱ्या फुलासाठी मग माणसे   काटे जपून का ठेवतात  जेव्हा जेव्हा फुल मधुरतात   तेव्हाच पाखरे घुमतात   फुलपाखरा  साठीच तर  कळ्या नटून बसतात  गरज नाऱ्या पावसात   वारे सोसाट वाहतात  माणसे गरजून थोडेच   वारे पाणी वेगळी करतात    डगडणार्‍या पावसात   ढग थोडीच वेगळी होतात  अशाने   पाकळ्यामध्येच  पाखर दडून बसतात    समाजाचा छळछाड   विजेसारखा तीव्र नसतो    मोहरण्याच्या काळात   माणसे माणसांना छळवतात    पानाच्या आडोशात काटे  सारखेच टपून बसतात  फुले तर फक्त वरती  पाखरासाठीच फुलतात  मोसमात सारेच रंग येतात  पिवळ्या पाखराच्या शोधात  सारेच का घुम घालतात  तेथेही कुणाचा का विद्रोह करतात  राजेश मेकेवाड 

घरट्याला त्या जिव्हाळ्याची कोण

Image
घरट्याला त्या जिव्हाळ्याचे कोण   वाऱ्याव  डोलक   फांदीला छळक   काळीज माझं  टाचुन घ्यावं   तुझ्या प्रतिमेचं   विणते जशी  सुगरण तसं  विनत जाव   आयुष्याला दोर  कसरतीचा खेळ  चालताना मातीला   विसरून जावं   सैर आकाशाची   पाखराला  ओढ   घरट्याला त्या   जिव्हाळ्याची कोण    राजेश मेकेवाड 

तुझी वेगळीच माया - कविता

Image
  तुझी वेगळीच माया हा देह लाल से पोटी   देवा आलो तुझ्या द्वारा  तुझं दर्शनात मजला  हिन न तयाची पर्वा  बंदिस्त लपे मंदिरी तू  पाहुणी  रंग वरवरचा  माघार द्यावे मजला  ब्रीद खोटा  तुझं  कृपणाचा    गाथा तुझ्या पुण्याची   म्हणती आभाळा हून मोठी  माझ्या मणी  काया    अन   तुझी वेगळीच माया  राजेश मेकेवाड

तू अशी छळतेस मला - कविता

Image
 तू अशी छळतेस मला तू अशी छळतेस मला   आकाशातला तुटलेला तारा   वाऱ्याच्या  तोलातला    झुलता प्रीतीचा मनोर  तू अशी छळतेस मला  पावसाळा प्रिय चातकाला   दव  मोत्यासारखी  तुझी   लपतात अजून पात्याला  तू अशी छळतेस मला   मी चंद्र काळोखातला   जणू दिव्य किरणाची   प्रकाशाची चंद्र कोर मजला    तू अशी छळतेस मला   हृदयात आठवणीचा रेत झरा   जगण्याला ओलावा तुझा   जणू वाळूवरचा  मी मासा  राजेश मेकेवाड 

दैत्याची ही सावली - कविता

Image
 दैत्याची ही सावली  सत्य बोला पांडुरंगा   दिल त्यास काय   हरला तो काळ्या माती   ढेकळाचा माऊली    झोपडीत जणू त्याच्या   तुझ्या पावलाची पाठ   भक्ती भाव जुनाट  रंगतात बाल रूप    लुटेऱ्याचे पोट मोठे   खाऊनीया   घेतले ते   विठ्ठलाची मूर्ती त्या   राबुनिया उपवासी  निसर्गाच्या    घावामधली   फाटकीच त्याची झोळी   पाठीशीही  उभे त्याच्या   दैत्याची ही सावली  राजेश मेकेवाड 

व्याकुळ _ कविता

Image
 व्याकुळ   _  कविता  क्षण भुंगुरल्या जीवात   डोळ्यात जरासी घेना  अश्रूची माझ्या होळी   सुटल्या ह्या पापण्या    रंग लाल केसरी ओठा मध्ये  गालेवरची गुलाब पाकळी   कळीत तुझ्या भिरभिरते  जीव या पाखराचा फिरते    मी वेडा खुळा ग प्रेमी  चाले तुझ्याच चाले वरती   तू एक माझी नशा नशेती  रोमांच नाचते अंगावरती  जाता मज पाहुनी तू दूर  कधी न जाता काळजाच्या   तुझ्या विना न दुरल्या वाटा  व्याकुळल्या  ह्या सावल्या माझ्या   राजेश मेकेवाड 

ओढ तुझी _ कविता

Image
 ओढ तुझी  _  कविता  माझ्या प्रीतीचा चंद्र  आज दूर कसा झाला  रुसलाय सूर्य तुझा  रात्रभर जागला    पोर्णिमेच्या प्रकाशात  अंधार कसा झाला   प्रेम ग्रहणात तुझ्या   माझा जीव कसा आला   राजेश मेकेवाड 

तूच एक _ कविता

Image
 तूच एक _  कविता  दुरली रात ही  शोधता अंधारी   सावली पेटली   नजरेत  कशी   सूर्य का दुरला   किरणात खेळुनी   ओढ  त्या प्रकाशाला   अंधाराची लागली    दिन कसा झाकला  वाहता डोळ्यात   सुटला हातूनी   पापण्या वाचुनी  भरल्या ओंजळी  आठवणी तुझ्या   धुतले नशिब   कोरे तूच आता   सप्त जन्म वेचले   पाहुनी तुझ्यात   हाती माझ्या लागता   हात तुझा हाती    कशा फुलल्या वाटा  वाटा माझा चुकुनी  दूर तुडवत मला   वाटा गेल्या कुठे   रांगल्या दिशा ह्या  लढुनी रनात  रडल्या कळ्या भी  पाकळ्या रंगून   भेगा ह्या रानात  काळजात घुसल्या  फुठुनी नसा ह्या  तूच एक जोमात  वारे हे आडले  शब्दा विन फांद्यात   गुज तुझी कानात   नाजूक ही झुळक   पिवळ्या पानात  हळद लाजुनी  हसली ओठात   ओठाला सांगुन  राजेश मेकेवाड

कवी ठसणारी - कविता

Image
 कवी ठसणारी  ए ग कवी  वेड लावी मला  तुझ्या गालाची  ग खळी  अण  ओठाची  रात झाली वेडी पीसी  मधुर गोडव्याची  कवी वोलाव्याची   कंबर नागमोडी  नदी काठेची सावल   देखणी चंद्राची बाहुली   ओंजळी पावसाचे पाणी  तहानेत  गोडव्याची   ओठात ठस णारी   चाल तुझी ग नटकी जरा   वळणाला माझ्या लागू दे  कधी ग तुझा तन तना  प्रीत फुलवावया   मन माझे   कवी कमळी पात्यात   दूर नको हा द्रव्य प्रकाश  शेजे विन  फटकळ  तुझ्या गोडव्यात   राजेश मेकेवाड 

पेटवून जात होते - कविता

Image
 पेटवून जात होते आज पहिल्यांदाच पाहिले मी  तुझ्या डोळ्यातले डोळे  खेळत होते त्यात काबर  आज  माझेच चेहरे    हसत होतो समोर तुझ्या   का ते भरून आले होते  चुकून आल्या होत्या वाटा   का वाहत होते तुझे डोळे  दिसत होते कधी असे कधी तसे  भावनेच्या खेळामध्ये खेळत  होते   गर्द माझ्या मनातले तडफडणारे   का पाण्याने दाटून आले तुझे डोळे  कळले होते डोळ्यालाच काय   मुके काहीतरी सांगत होते   कळत होते कोणाला त्याचे शब्द   अर्थ बनून चित्र दिसत होते    पापण्यात का लपूण पाहत होते  स्वागताचा सडा माझ्या वाटेवरती   आठवणीत आठवणीनेच बांधून  ठेवले   तुझ्याही महापुरात  माझे आले डोळे रोजच्या वाटा तुडवीत येत होते  आनंदाचा क्षण ही सारून जमत होते   कधी तुटावे कधी भरावे कधी रडावे   कधी हसावे कधी खेळावे तर  कधी कधी पेटून जात होते  राजेश मेकेवाड 

छळतो मला - कविता

Image
 छळतो मला अंधारी राहत पाहून राजा   धीर मात कधी सोडू नको   येईन चांद तुझ्या भी कवेत   आकाशी मन सोडू नको   येतात वारे वादळ थोडी   जिवा प्रती कधी भिडवतात   वाटही त्याची दुरून जाते   पाहून एकटा असरा देते  Rajesh Bhaskar Mekewad    सावली भेटते सावलीला   उन त्याच्याही आडोशाला   छळतो कधी एकटाच मला   सावली दिव्याची पण तिला 

ओढ _ कविता

Image
  ओढ _  कविता मनाला या ओढ   तशी चंद्राची कोर   माझ्या डोळ्याला लागे   तिच्या कोरेची काजळ   पाहूनी या ते डोळे   झाकले आकाश   जिथे तिथे झाले   ते चांदण्याचे रूप   भर भरून नभात   ओजंळीचा हात   सर   तृप्त तहानेची  भर  भरते जीवनात   उमलते सुखाचे   कोवळ्या कळ्यात   नवरंग पाखराचे   जीव जडते तुझ्यात     गंध    प्रेमाचा   फुलू   दे  हृदयी  तुझ्या रोमा रोमात   भिडू दे मला भी   हसऱ्या जीवाला  मोगऱ्याची साथ   फुलते पहाटे   तुझे गोड चित्र   राजेश मेकेवाड 

जगण्याचे धडे नको - कविता

Image
जगण्याचे धडे नको   गुंतलेल्या   मनाला   मोकळे   वारे   नको   जीवाच्या पाखराला  फुलावरती बंदिस्त नको    पावसाच्या शब्दांना   भावनाचे बंध नको   हृदयाच्या स्पंदनाला   स्पर्शाचे डोळे नको  उसळलेल्या वादळाला   प्रीतीचे गळ नको   प्रेम धुंद वेड्यांना  जगण्याचे धडे नको  साथ रंगलेल्या चित्रांना  रांगोळीची संगत नको   बांधलेल्या धाग्यांना   कल्पनेचे झरे नको    राजेश मेकेवाड 

झिरमिळ - कविता

Image
 झिरमिळ  तुझ्या रूपाचं चांदणं   डोळे भरून पाहीन   कधी जागल्या रात्रीची   आठवण ग भिजल   ह्या फुलातला गंध   पाकळ्या सोडून जाईन   पाखराचे ते झुरणं   तेव्हा कळलं पाहून    रंग लावून अंगाला   सारं शिवार सुखन   राजा विना हे जीवन   पुन्हा होईल झरनिळ   पुन्हा होईल झिरमिळ  राजेश मेकेवाड

प्रेमाचा पसारा - कविता

Image
 प्रेमाचा पसारा मी शोधू आता कुठे  प्रेमाचा पसारा  दिशाहीन अंततेचा   पुन्हा लागेल का जिव्हाळा  वचनी दोघांची  अपूर्ण  त्या काठेला    तुझी झाली सोन्याची   मी अजून त्याच वाटेला   तुझा  चिव चिवाट   स्थिरावते मनाला   विराटलेल्या काळजाचे   झरणे लागते गळाया  राजेश मेकेवाड