Posts

Showing posts with the label प्रीत

तू कशाला _ कविता

Image
  तू कशाला _ कविता तुला तुझीच ओढ  अन माझी साथ कशाला.  एकांत जरी उरला  तुझी दहशत कशाला.  घार झाला माझाच जीव  तुझी शिकार कशाला.  वाट तुझीच शोधत गेलो  तुझ्या जंगलात कशाला .  उसळत गेलो नदीसारखा   स्थिर तुझा काट कशाला .  वणव्यात गेले आयुष्य माझे  वरती अश्रू तुझे कशाला.  नशा चढली भलतीच  तुझ्या साठी वेगळी नशा कशाला.  अत्तरातून वेगळा झालो  फुलांची संगत आता कशाला .  गंध गेला दाहीदिशा  ती दिशा आता कशाला.  उरलो जरी गर्दित एकटा  सोबतीला तु कशाला. तुझ्या पालखीला हात माझा माझ्या अंत्ययात्रेत तू कशाला  कवि. रा.भा.मेकेवाड  

स्वो भुकेचे कुठे माप _ कविता

Image
स्वो भुकेचे कुठे माप   हुरड्यातल्या पिकावर  पाखराची चोचभर  घरट्यातल्या चोची पायी   चोच फिरे  रानवन    काट्याकुट्याचा विचार ज पिल्लासाठी नाही केला   दानापाणी घेऊनीया  चीन  घरट्याच्या आसऱ्याला    वादळी उभे वाटेवर   हात धरुनी काळाचा घरट्याच्या भुके पायी   स्वो भुकेचे   कुठे माप    .....   राजेश मेकेवाड 

प्रीत - कविता

Image
    प्रीत - कविता प्रित कस्तुरी  फुलपाखरा परि   न हाती फुलांच्या  ही मृगजळी .   चंचल ज्वानी  भासते एक परी  परिस पैंजण भारी  कुबेराची राणी .  मी एक मृग  शोधात फिरतो कस्तुरी  पाहताच लई लाजरी  ती मज जीवाभारी  तुझ्या वाटेवरती   प्राण विसरूनी  नसा नसात फुटते  तुझी चाहुली .   न हाती कुणाच्या  न हातामधी  काढली नजरेची तू सावली  संग तुझ्याच जाती ही पापणी   डोळ्याची काजळी  तू कशी काढली .   रात्र जळते पाहुनी पुनवेची  ती अशी कशी  मजहूनी भारी  मी सर्व परी होऊन ही सुंदरी   ती  शुभ्र शीत  चंचल  मखमली  संग कस्तुरी  .                       - राजेश मेकेवाड