Posts

Showing posts with the label उतार - कविता

कोण ती काळी

Image
 कोण   ती   काळी  जात विचारतो आसवांची   तहान मीठवते म्हणूनी    लागलीच नस्ती  कधी मला  वीष पाजवले नस्ते कोणी  तिलाच का अमृत पाजवतो  आठवणीच्या गाभ्यात ठेवुनी   भूक जाणवते अमृताची  घास भरून जाते विषारी  डोळ्यांमध्ये प्राण तगमगते  समोर तिलाच का पाहुणी   अश्रुच्याही  वेदना सांगतात  माझ्यासाठी वीष सांभाळूनी   वीष दिले सर्वदा तिने  भुकेपोटी पिऊन घेतले  मरण तीथे  रमले माझे   जगणे कुठे राहिले मोठे   कोणी असो विषारी दिसते   सांगताना का हरवून जाते  माय असावी पुत्र तिचा  मित्र सखा का प्रेमी असावा   राजेश मेकेवाड 

बेगड _ कविता

Image
बेगड   _  कविता बेगड दिसनाऱ्या  या युगात जगण्याला मी काय मागू अंतरीचा  जाळ माझ्या  उगीच वेगळा का होऊ  दाखवून दे  या जगाला   जगासारका  रंग वरवरचा  अंतरीचा कोण पाहतो  तू वेगळा  का दुर्मिळतेचा  शोध नव्याने घेतील लोक   हक्काचा तुझ्या वध करुनी  नह्यात तेत तुझ्या अस्तित्वाचा   उत्तराचा पाटला  करतील सारे मनमोकळ्या मानुसकिचा   शोध घेतील मानव वाटा   जिवंत प्रश्न समोर ठेव   व्यर्थ संच भूतकाळाचा    ...   राजेश मेकेवाड  Rajesh Bhaskar Mekewad 

तुझी वेगळीच माया - कविता

Image
  तुझी वेगळीच माया हा देह लाल से पोटी   देवा आलो तुझ्या द्वारा  तुझं दर्शनात मजला  हिन न तयाची पर्वा  बंदिस्त लपे मंदिरी तू  पाहुणी  रंग वरवरचा  माघार द्यावे मजला  ब्रीद खोटा  तुझं  कृपणाचा    गाथा तुझ्या पुण्याची   म्हणती आभाळा हून मोठी  माझ्या मणी  काया    अन   तुझी वेगळीच माया  राजेश मेकेवाड

ओठावर केसर - कविता

Image
 ओठावर केसर रोज रातची   स्वप्ने माझी   पंख दिशा दिशा   तुझ मागते    खेळते मखमली डोळ्यामध्ये  दिव्य नजरेची  चमक तुझी तोरण   आरसा तुझ्या रूपाचा   या युगाचा तू सुर   रात खेळते  पाण्यावरचा जाळ  चांदणे कवेत  माझ्या   सख्या  लावते रात   तुझा जीव गुणकार   मी  गुण केसर   ठेवते  ओठावर  राजेश मेकेवाड 

व्याकुळ _ कविता

Image
 व्याकुळ   _  कविता  क्षण भुंगुरल्या जीवात   डोळ्यात जरासी घेना  अश्रूची माझ्या होळी   सुटल्या ह्या पापण्या    रंग लाल केसरी ओठा मध्ये  गालेवरची गुलाब पाकळी   कळीत तुझ्या भिरभिरते  जीव या पाखराचा फिरते    मी वेडा खुळा ग प्रेमी  चाले तुझ्याच चाले वरती   तू एक माझी नशा नशेती  रोमांच नाचते अंगावरती  जाता मज पाहुनी तू दूर  कधी न जाता काळजाच्या   तुझ्या विना न दुरल्या वाटा  व्याकुळल्या  ह्या सावल्या माझ्या   राजेश मेकेवाड 

ओढ तुझी _ कविता

Image
 ओढ तुझी  _  कविता  माझ्या प्रीतीचा चंद्र  आज दूर कसा झाला  रुसलाय सूर्य तुझा  रात्रभर जागला    पोर्णिमेच्या प्रकाशात  अंधार कसा झाला   प्रेम ग्रहणात तुझ्या   माझा जीव कसा आला   राजेश मेकेवाड 

तूच एक _ कविता

Image
 तूच एक _  कविता  दुरली रात ही  शोधता अंधारी   सावली पेटली   नजरेत  कशी   सूर्य का दुरला   किरणात खेळुनी   ओढ  त्या प्रकाशाला   अंधाराची लागली    दिन कसा झाकला  वाहता डोळ्यात   सुटला हातूनी   पापण्या वाचुनी  भरल्या ओंजळी  आठवणी तुझ्या   धुतले नशिब   कोरे तूच आता   सप्त जन्म वेचले   पाहुनी तुझ्यात   हाती माझ्या लागता   हात तुझा हाती    कशा फुलल्या वाटा  वाटा माझा चुकुनी  दूर तुडवत मला   वाटा गेल्या कुठे   रांगल्या दिशा ह्या  लढुनी रनात  रडल्या कळ्या भी  पाकळ्या रंगून   भेगा ह्या रानात  काळजात घुसल्या  फुठुनी नसा ह्या  तूच एक जोमात  वारे हे आडले  शब्दा विन फांद्यात   गुज तुझी कानात   नाजूक ही झुळक   पिवळ्या पानात  हळद लाजुनी  हसली ओठात   ओठाला सांगुन  राजेश मेकेवाड

स्वप्ने सजावी - कविता

Image
 स्वप्ने सजावी    _ कविता  भविष्य उद्याचे   आजच घडवू  आनंदमय युगाच्या  प्रकाशात खेळू    स्वार्थी मनाचा   विनास करुनी   युगाच्या ही युद्धाला   प्रेमाने जिंकू    सर्वाच्या हृदयाला  फुलवून ठेवू   स्वप्ने आपुली  महात्म्यांत पाहू    मदतीचे आम्ही  पोलादी वृक्ष बनू   एकतेची मिळून   गोड फळे  चाखू    दिव्य प्रकाशात   राष्ट्र भव्य उभारू   विश्वात माझ्या   धर्म अहिंसेचा वाढो  शुभ्र आकाशात   मन  निर्मळ उधळू   आनंदमय युगाच्या   प्रकाशात खेळू    राजेश मेकेवाड 

झुंज ते मराठी - कविता

Image
 झुंज ते मराठी _   कविता  मन तुझे दिसते मला  त्या वाऱ्यावर जाताना   आह तुझी तडफडते   आपुलेच   पंख तुटताना .   काड्या काड्या  गुंफुनीया  शब्दात आपूले शोधताना   घरटेही बांधलेस तू    परक्यासी झुंज खेळताना .   चांदण्याच्या पुजंक्यावर   झोके तुझ्या स्वप्नाची   आम्ही मायेसी  परके झालो   रसाळ मोह शब्दा  मधुनी .   गतवैभव  अवतरावे  ओव्या  मधुनी  रममान   शब्द ओसांडून फुलावे   गंध रेंगाळत मराठी  .  संत  झऱ्याचा जन्म झाला  गोदाचे शांती विराट   सह्याद्री कवच घालूनी   मराठी झुंजते  रणांगणात  . राजेश मेकेवाड 

पानावलो - कविता

Image
 पानावलो    _  कविता राबणाऱ्या खुरट्या झुडपांना  मी कधी तोडले नाही   कष्टाळू काट्याला   टाचे खाली घेतलो नाही    मुंगी सारखा चेंगरत  असताना   काटा असूनही  उगीच   कोणाला टोचलो नाही  तापून तापून रानावरती  कोरडा झालो   मी मातीसारखा   मनात भेगाळलो नाही  भुकेल्यास घास भरवतो   कधी कधी  उगीच स्वार्थासाठी देवाला  प्रार्थना करीत नाही  मी रोज धेव्हाऱ्यात  संध्याकाळी दिवा लावतो  कोणता भडवा माझा  अंधार हटवत नाही   पाखराच्या झोपड्याला   कुठे छेडलो नाही  कुणाच्या घरट्यात बसून  कोनाचे वासे मोजलो नाही  चवीत कुणाच्या खारट झालो  मी अत्तर झालो नाही  घुमत बसलो पंगती पंगती  कुठे दरवळत गेलो नाही    राबून राबून रानामध्ये  घामावलो असेल  मी कोण्या डोळ्याला  पानावलो नाही    मी कोण्या डोळ्याला  पानावलो नाही       राजेश मेकेवाड. 

राजकारणी - कविता

Image
राजकारणी - कविता    खोटे मोडून दावले   सत्य खोडुन दावले   पाहिले घूरुन मला   मी काळे डाग दावले .   सारेच होते बेगडी   पडद्यास पुसून दावले   गुराळ तुमचे लावलेले   कोपराला गुळ लावले .   कित्येक घरचे बाप   नसेल गळावर चढले   दाबून तुम्ही तेथेच   घरटे जाळुन टाकले .    एका एका मतासाठी   करते डबल वाटले   एक एक मत बाटलीत   तुम्ही  बुडून काढले .    कित्येक मत वाचले   तुमच्या घाणिरड्या  कृत्यात    कितेक घरचे एक एक मत  कायमचे गेले .  किड्या  मुंग्याचं जगणं  टांगत्या शिक्यावरती   लटकून ठेवलेलं तुम्ही   तुमच्या फक्त हितासाठी .    राबणारे हात उटले हितासाठी   तेच बोट पुन्हा फिरले आमच्यावरती .  राजेश मेकेवाड

परीक्षा _ कविता

Image
परीक्षा  _  कविता क्षणोक्षणी ती पाहत होती दाही दिशा जाता ऐता .  नाजूक नाजूक टाचा   चुकत होत्या आता  आयुष्याच्या वळणावरती  टिचलेल्या काचा    स्वप्नभंगलेल्या  मी अजून   त्याच  तुडवतो   वाटा    राजेश मेकेवाड

उतार - कविता

Image
उतार -  कविता  बोल माझे जरी अडखळले   वाट तुझी का अडखळावी   पापण्यांमध्ये    साचलेल्या   प्रश्नाची उत्तरे  सर  करावी अनोळखी बहरल्या फुलांची   पाखराला   स्पर्शून   घ्यावी   पडद्यावरती नव्या जीवनाची   सांगता संगत रंगीन करावी  साचलेल्या भावनांची   बाहुली बोलकी असावी   चालताना हातामध्ये   पावलांना उतार द्यावी       राजेश मेकेवाड