सांग सखे हा कमळ कुणाचा प्रेम कविता


सांग सखे हा कमळ कुणाचा 


पाण्यावरती घाव घालूनी 
नाही कुनाला दिसला
डोळ्यामधल्या व्यथा पाहूनी
अश्रू मधला बोल सुटला 


नव जिवनी पाझर माझ्या
चालत्या झाल्या गंगा राई  
खळखळणाऱ्या यमुना काठी 
तुज विण काई भान नाही 


या देहाचे वारूळ झाले 
त्या देहाला ठाऊक नाही 
दिवा झाला राख जरी 
पणतिचा त्या मंद मंजरी


 वाहून गेला वारा तयाचा 
कळ्या वरती गंध फुलांचा 
सांग सखे हा कमळ कुणाचा 
तुज पापण्यासाठी दरवळणारा 


      ..... राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड




Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi