Posts

Showing posts with the label झुंज ते मराठी _ कविता

कुठे शुभ्र फडकत आहे

Image
कुठे शुभ्र फडकत आहे  दगडाला शेंदूर लावला   मला रंगाची भीती झाली  काल निळा फडकत होता  तिथे आज भगवा फडकत आहे  कोणाला ठावे उद्या कोणता  रंग उधळनार  आहे  या बे रंग जीवनाचा  कोणता रंग खेळणार आहे  कळ्यांची दरवळ  झाडांची हिरवळ  नभासी निळाई  अंधारलेल्या मनामध्ये  कुठे शुभ्र फडकत आहे  राजेश मेकेवाड 

झुंज ते मराठी - कविता

Image
 झुंज ते मराठी _   कविता  मन तुझे दिसते मला  त्या वाऱ्यावर जाताना   आह तुझी तडफडते   आपुलेच   पंख तुटताना .   काड्या काड्या  गुंफुनीया  शब्दात आपूले शोधताना   घरटेही बांधलेस तू    परक्यासी झुंज खेळताना .   चांदण्याच्या पुजंक्यावर   झोके तुझ्या स्वप्नाची   आम्ही मायेसी  परके झालो   रसाळ मोह शब्दा  मधुनी .   गतवैभव  अवतरावे  ओव्या  मधुनी  रममान   शब्द ओसांडून फुलावे   गंध रेंगाळत मराठी  .  संत  झऱ्याचा जन्म झाला  गोदाचे शांती विराट   सह्याद्री कवच घालूनी   मराठी झुंजते  रणांगणात  . राजेश मेकेवाड