Posts

Showing posts with the label जगण्याचे धडे नको

जगण्याचे धडे नको - कविता

Image
जगण्याचे धडे नको   गुंतलेल्या   मनाला   मोकळे   वारे   नको   जीवाच्या पाखराला  फुलावरती बंदिस्त नको    पावसाच्या शब्दांना   भावनाचे बंध नको   हृदयाच्या स्पंदनाला   स्पर्शाचे डोळे नको  उसळलेल्या वादळाला   प्रीतीचे गळ नको   प्रेम धुंद वेड्यांना  जगण्याचे धडे नको  साथ रंगलेल्या चित्रांना  रांगोळीची संगत नको   बांधलेल्या धाग्यांना   कल्पनेचे झरे नको    राजेश मेकेवाड