Posts

Showing posts with the label बंड जीवनाचा

आमचा घास _ कविता

Image
 आमचा घास _ कविता  कोण देतो कोण भावना ओळखतो   शब्दांना कुठेतरी तुम्ही चित्र पाहतो   विचित्र दिसला की अनोळखी सोंग घेतो  देव तर कुठे फाटक्यांना विचारतो  दगडांना खूप काही दान देतो  माणुसकीला विद्रोहाचा शेंदूर पुसून  सरकारी बांधिलकीची श्रीमंत तुम्ही  गरिबांना कधी कुठे मोकळे सोडतो  शेतकऱ्याची कसरत भावल्यांचा खेळ वाटतो  सर्वाचं पोट भरवतो त्याच  हातावरती धरतो  भुकेमुळे झाला कुठे अपघात जेथे  शेतकरीच प्रथम मृत्यू  मुखात सापडतो  देव देवता नेच केला हो आमचा घात  सरकारचा कसा पोहोचेल तो हात  बुद्धी जीवांचे चालते इथे  प्रशासन  ओठावर एकाच्या पोटात एकाच्या    बांधून देतो हो आम्ही आमचाच घास   बांधून देतो हो आम्ही आमचाच घास     राजेश मेकेवाड 

बंड जीवनाचा - कविता

Image
बंड जीवनाचा - कविता    दुःखाचा भात का  शिजवतात काळजात    मुडदेच खाऊन जातात  ठेवून जिवंत मुडद्यास . कर्म करता जनाचे केले  हात आमचे कर्मानेच धुले  आयुष्य सारे कर्मात घातले  कर्मानेच आमचे घात घेतले . कष्टात आयुष्य आम्हीच वेचले  जन्म घालूनी नव्या क्रांतीचे  क्रांतीनेत सारे बदलून टाकले   आमच्याच पदरात गोठे घातले . आश्वासनात बांधून ठेवले  सत्येच कुठे मावळून गेले  त्यालाच आम्ही उगवित बसलो  सत्यामुळेच वनवास भोगलो . आमच्याच रक्ताच्या ज्योती लावूनी  जळलो त्यांनाच प्रकाशात ठेवूनी  उधळून टाकल्या साऱ्याच वाटा  अंधार सारा  आमच्याच वाटी - राजेश मेकेवाड