Posts

Showing posts with the label अंधार लागला हाती

आस मोठी _ कविता

Image
 आस मोठी _ कविता  मुख श्रवण बधिर झाले  हुंड्यामद्ये   प्राण गुंतले  नाही असा शब्द नाही  मुखामध्ये घडून सजले  काळीज चिरुन दान केले  कन्यादानाचे घाव सोसले  वधु पित्यास का विष मिळाले  हुंड्याने कुठे अमृत घेतले  बालहत्याचे आम्ही वाली  पैशाची ही लावून बोली  प्राणाचा ही छेळ  करूनी  आस  मोठी ठेवतो म्हणी  सुवर्ण देवता हुन मोठी   नवदेवता तोळ्यामध्ये   दुष्ट प्रवतीचा  साज घालुनी  पाहण्यास आस लावती  राजेश मेकेवाड 

विस्कळलेला _ कविता

Image
 विस्कळलेला _  कविता कुठे शोध  माणसाचा    पुसावा  जगाचा आरसा उभा  लागला तू भलताच मागे  पुढचा कोण वळुन पाहतो  तुला  विवष्य झाले  जिवन  माझे  जगणे सारे उधार आहे  बाजार आपला विस्कळलेला   आधार कुठे मांडला  आहे  राजेश मेकेवाड  

कधी कधी _ कविता

Image
कधी कधी _ कविता  कधी लाजते कधी रुसव्या मनात कधी गोड बोलते  कधी गोडवा पुसते  कधी स्तुती माझी कधी खट्याळ बोलते कधी दानवीर कधी भिकारी सांगते  कधी जीवलगा  कधी  वैऱ्यात ठसवते  कधी भेटते  कधी अर्ध्यात सोडते  कधी कळ्यात  कधी दगडात  पाहते  कधी डोळ्यात मूर्ति  कधी आरसा पुसते   कधी पावसात  ते  वेडावते वारे  मिठीत  पापण्यांच्या   कधी व्याकुळ असते  राजेश मेकेवाड 

आठवणीची पूजा करतो मी

Image
 आठवणीची पूजा करतो मी  चुकलेस तू माझ्या वाटा  मी चुकलेल्यास वाटा देत आहे  सोडलेस मला अर्ध्यात तू   मी अर्ध्यातल्याला हात देत आहे  अश्रू   तुझ्या नावाचे साठवीत   रडणाऱ्यास मी हसवीत आहे  तू दिलेल्या मला वेदनेत  मी सर्वाच्या वेदनेवर  औषध देत आहे  जास्तच रागावतेस कधी माझ्यावर  सर्वांसहीत  तुझ्यावर ही तेवढेच प्रेम  तू दिलेल्या शब्दात विष मला   मी विषाऱ्यास आता  अमृत देत आहे    रात्र रात्र जागवली आठवणीत तुझ्या   मी  जागणाऱ्यास    झुलवत आहे   दिवसाच्या येणाऱ्या अपयशात मला  मी सूर्यच  यशाने भरून उगवित आहे   विसरलेस तू तुझ्या खऱ्या प्रेमिला   मी प्रत्येकाच्या वैऱ्यासोबती   आहे   परके केलेस तू तुझ्याच नात्याला  मी परक्यासही आपुलकिले   आहे  वगळलेस तू माझ्या नावाला  तुझ्या शब्दाची ही पूजा करीत आहे   विसरलेस पेटलेल्या झाडाच्या सावल्याला   मी आजही त्यात जळत आहे   राजेश मेकेवाड 

बेगड _ कविता

Image
बेगड   _  कविता बेगड दिसनाऱ्या  या युगात जगण्याला मी काय मागू अंतरीचा  जाळ माझ्या  उगीच वेगळा का होऊ  दाखवून दे  या जगाला   जगासारका  रंग वरवरचा  अंतरीचा कोण पाहतो  तू वेगळा  का दुर्मिळतेचा  शोध नव्याने घेतील लोक   हक्काचा तुझ्या वध करुनी  नह्यात तेत तुझ्या अस्तित्वाचा   उत्तराचा पाटला  करतील सारे मनमोकळ्या मानुसकिचा   शोध घेतील मानव वाटा   जिवंत प्रश्न समोर ठेव   व्यर्थ संच भूतकाळाचा    ...   राजेश मेकेवाड  Rajesh Bhaskar Mekewad 

एकटे राहण्या ऐवजी कोणाचे तरी व्हावे _ कविता

Image
 एकटे राहण्याऐवजी कोणाचे तरी व्हावे  एकटे राहन्या ऐवजी   कोनाचे  तरी  व्हावे    पान   गळीचा  ह्या   कुठे  रुसून  जावे   नव कोमल तारुण्याचे   झिरमिळ झाले झाड   पाखराच्या चोची वरती   नाही डाळिंबाचे दान   सैर झाली स्वप्नाची   दमलेल्या राघूची   मैने विना घरट्याची   नवती कुठे  हरवली झाडाची    ..... राजेश  मेकेवाड 

स्वो भुकेचे कुठे माप _ कविता

Image
स्वो भुकेचे कुठे माप   हुरड्यातल्या पिकावर  पाखराची चोचभर  घरट्यातल्या चोची पायी   चोच फिरे  रानवन    काट्याकुट्याचा विचार ज पिल्लासाठी नाही केला   दानापाणी घेऊनीया  चीन  घरट्याच्या आसऱ्याला    वादळी उभे वाटेवर   हात धरुनी काळाचा घरट्याच्या भुके पायी   स्वो भुकेचे   कुठे माप    .....   राजेश मेकेवाड 

लहानपणीच्या व्यथा _ कविता

Image
 लहानपणीच्या व्यथा  कुठे गेले रे बालपण   मधमाशासारखे उडून   किती एकांतेत  राहत होतो  पोळी वरती टोळी जपून  मधासहित चाकत होतो   एकमेकांच्या ओठासी  घुमून तेथेच बसत होती  पुन्हा ती रागवलेली मधमाशी  कट्ट्यावरच्या थटा    लागल्या दाही दिशा   आता कोणत्या वाटेवरती  शोधू लहानपणीच्या व्यथा   .... राजेश मेकेवाड 

अंधार लागला हाती

Image
 अंधार लागला हाती .   चंद्रमुखी चेहरा तुझा   पडद्यात झाकला किती   पापण्याच्या चाँद कोरी   प्रीत उमल कोवळी   पणती पाई  ठाव  दिव्याचा   अंधार समई खाली  साथ तुझी ही वाटेवरची  वीर ते सावली    पाखराची पंख कोवळी   घरट्यास तुझी  चाहुली   चोच  तुझी ही सांजवेळी   ओढ  काळजावरी    हात हातून सुटला कधी   पाण्यावरची भातुकली     गंधा पायी घूम घालते   फुलावरची फुलपाखळी .   राणी जवळी येना  अंधार लागला हाती     राजेश मेकेवाड