कवी जळत होता - कविता

 कवी जळत होता


सहज तुझी आठवण आली
 त्यात माझी काहीच  चूक नव्हती
 दारावरचा रस्ता तुडवीत होतो
 तसे काम वाटेवरचेच काहीतरी  .



तू लावलेला तुझ्या अंगणातला दिवा
 वाऱ्यात डगमगत जळत होता
 कामात तू एवढे गुंतलेस की
 हाताचा आडोसा मागित होता .



तुला प्रकाशात ठेवण्यासाठी
 उभे आयुष्य जळत होते 
या समाजाच्या छेडछाळामध्ये
 जगण्यासाठीच हात मागित होता .



खरे काय अन खोटे काय 
तुलान मलाच माहीत होते 
तू अशी ज्योत लावलेस की 
माझेच स्वप्ने जळत होते .



तू लावलेला सौभाग्याचा दिवा 
का राहिला अंधारात उभा
 पापण्यातून गळते त्याच्या
 तुझ्या कुंकवाचा ओलावा  .



तू कधी ह्याच्या कधी त्याच्या तर कधी सर्वाच्या
 आयुष्यभर प्रकाशात राहिलीस
 तो दिवा काहीच मागित नव्हता 
 त्यात मात्र हा कवी जळत होता 


 त्यात मात्र हा कवी जळत होता .


  • राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi