असोसणारी आस ती _ कविता

 असोसणारी आस ती _ कविता  


सळसळ दव छळी 
अळवाची  पान ती  
स्पर्श मोह तुझवरी
 लाजाळूची वेड वेली 


ओढ ती उरातली 
 उतरली मृगजळी 
सोड रात  थोडी 
 शुक्र ताऱ्यावरची 


 ओठावर कस्तुरीची 
 दाट ती  कोवळी 
चातकाच्या चोचीवर 
टिपणारी पावसाळी 


 घरट्याची  उब  माझ्या 
वेगळ्याच मधावरी 
डंख मधाळ माशीचा 
असोसनारी  आस ती  
 

राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा