राजकारणी - कविता

राजकारणी - कविता 

 

खोटे मोडून दावले 
 सत्य खोडुन दावले 
 पाहिले घूरुन मला 
 मी काळे डाग दावले .


 सारेच होते बेगडी 
 पडद्यास पुसून दावले  
गुराळ तुमचे लावलेले 
 कोपराला गुळ लावले .


 कित्येक घरचे बाप  
नसेल गळावर चढले 
 दाबून तुम्ही तेथेच  
घरटे जाळुन टाकले . 


 एका एका मतासाठी 
 करते डबल वाटले  
एक एक मत बाटलीत 
 तुम्ही  बुडून काढले . 


 कित्येक मत वाचले 
 तुमच्या घाणिरड्या  कृत्यात 
  कितेक घरचे एक एक मत 
कायमचे गेले . 


किड्या  मुंग्याचं जगणं
 टांगत्या शिक्यावरती 
 लटकून ठेवलेलं तुम्ही 
 तुमच्या फक्त हितासाठी . 

 

राबणारे हात उटले हितासाठी 
 तेच बोट पुन्हा फिरले आमच्यावरती . 


  • राजेश मेकेवाड


राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi