स्वप्ने सजावी - कविता

 स्वप्ने सजावी    _ कविता 



भविष्य उद्याचे 
 आजच घडवू
 आनंदमय युगाच्या
 प्रकाशात खेळू 

 


स्वार्थी मनाचा 
 विनास करुनी 
 युगाच्या ही युद्धाला 
 प्रेमाने जिंकू 

 


सर्वाच्या हृदयाला
 फुलवून ठेवू  
स्वप्ने आपुली
 महात्म्यांत पाहू 
 


मदतीचे आम्ही
 पोलादी वृक्ष बनू 
 एकतेची मिळून  
गोड फळे  चाखू 
 


दिव्य प्रकाशात 
 राष्ट्र भव्य उभारू  
विश्वात माझ्या 
 धर्म अहिंसेचा वाढो 



शुभ्र आकाशात  
मन  निर्मळ उधळू  
आनंदमय युगाच्या 
 प्रकाशात खेळू 


  •  राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा