अनोळखी chha - कविता

 अनोळखी  chha - कविता 

जीवन माझे थोडे  
 उरले वरचे वजा घे
 जमला टाका धागा दोर 
 नव्या हाताचे शिवण दे 


उधार तुझा आधार दे  
थोडे माझे जगणे घे  
बोल मुक्या काळजाचे 
 स्पंदनात कधी पसरून घे 


गळवळीचा पाऊस मोठा 
दरवळीचा गंध घे 
तुझ पापण्याला अंतराचे 
मज डोळ्याला हुंदके दे  


भिर भिरणारी चोच चातकी
 जमले थोडे पाणी दे 
 पाठ प्रीतीचा खळखळणारा 
 तुझं काळजाला झरणे  दे 


जमले कधी तुझं काळजाला 
पिळ घालने पाकळ्याला 
 रंगीन फुले वेली वरती  
पंख पसरू दे पाखराला 


  •  राजेश मेकेवाड 


राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi