हव हवस झाड - कविता

 हव हवस झाड 


ऊन वारा पाऊस थंडी
 सार काही गेलं असतं 
तरी मला चांगलं होतं
मात्र ते झाड हव हवस होतं .



कमरेतून लचकणारी फांदी 
 पाहून खेळणारे पान 
 नटलेल्या फुलातला गंध 
फुलपाखराचा त्या रंग 


सार काही गेलं असतं तरी चांगलंच होतं 
 मात्र ते झाड हवं हवंस होतं 
.


पाखरांचा चिवचिवाट
भिरभिर नाऱ्या पंखाची साथ
फांदीतून निसटलेला हात 
 मिठीत घेतलेली ती वाट .


सार काही गेल  असतं तरी चांगलंच होतं
 मात्र ते झाड हवं हवस होतं 


डोळे भरून पाहिलेले रूप 
 स्वप्नातून बांधलेले घर 
व्याकुळतेने घेतलेली
 पिल्लांच्या चोचीतली चोच 


 सार काही गेलं असतं तरीही मला चांगलंच होतं  
मात्र ते झाड हवं हवं होतं .


रोजच्या पाडातला रस
 खाताना झालेले लाल ओठ 
रुतलेल्या गोडीतली जीभ 
जपलेल्या जिभेवरची चव 


 सार काही गेलं असतं तरी चांगलंच होतं 
मात्र ते झाड हवाहवास होतं
  


त्या उन्हाळ्यातला गारवा 
 हिवाळ्यातली गर्मी ती 
 पावसाचा लपलेला आडोसा 
 उन्हात पडणारा पाऊस 


 सार काही गेलं असतं तरी चांगलाच होतो 
मला ते झाड हवं हवं होतं 


सारं काही गेलं असतं 
 तरी मला चांगलं होतं  
मात्र त्या अंगणातलं झाड 
 का हवं हवस वाटत होतं ?


  • राजेश मेकेवाड


राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा