तू अशी छळतेस मला - कविता

 तू अशी छळतेस मला


तू अशी छळतेस मला 
 आकाशातला तुटलेला तारा 
 वाऱ्याच्या  तोलातला  
 झुलता प्रीतीचा मनोर 


तू अशी छळतेस मला 
पावसाळा प्रिय चातकाला 
 दव  मोत्यासारखी  तुझी 
 लपतात अजून पात्याला 


तू अशी छळतेस मला 
 मी चंद्र काळोखातला 
 जणू दिव्य किरणाची 
 प्रकाशाची चंद्र कोर मजला 

 

तू अशी छळतेस मला 
 हृदयात आठवणीचा रेत झरा  
जगण्याला ओलावा तुझा 
 जणू वाळूवरचा  मी मासा 


  • राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा