पेटवून जात होते - कविता

 पेटवून जात होते


आज पहिल्यांदाच पाहिले मी
 तुझ्या डोळ्यातले डोळे 
खेळत होते त्यात काबर 
आज  माझेच चेहरे 


 हसत होतो समोर तुझ्या 
 का ते भरून आले होते 
चुकून आल्या होत्या वाटा 
 का वाहत होते तुझे डोळे 


दिसत होते कधी असे कधी तसे 
भावनेच्या खेळामध्ये खेळत  होते  
गर्द माझ्या मनातले तडफडणारे  
का पाण्याने दाटून आले तुझे डोळे 


कळले होते डोळ्यालाच काय 
 मुके काहीतरी सांगत होते 
 कळत होते कोणाला त्याचे शब्द 
 अर्थ बनून चित्र दिसत होते 


 पापण्यात का लपूण पाहत होते 
स्वागताचा सडा माझ्या वाटेवरती 
 आठवणीत आठवणीनेच बांधून  ठेवले 
 तुझ्याही महापुरात  माझे आले डोळे


रोजच्या वाटा तुडवीत येत होते
 आनंदाचा क्षण ही सारून जमत होते  
कधी तुटावे कधी भरावे कधी रडावे 
 कधी हसावे कधी खेळावे तर 
कधी कधी पेटून जात होते 


  • राजेश मेकेवाड 

Rajesh mekewad



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा