आठवणीची पूजा करतो मी

 आठवणीची पूजा करतो मी 


चुकलेस तू माझ्या वाटा 
मी चुकलेल्यास वाटा देत आहे 
सोडलेस मला अर्ध्यात तू 
 मी अर्ध्यातल्याला हात देत आहे 


अश्रू   तुझ्या नावाचे साठवीत 
 रडणाऱ्यास मी हसवीत आहे 
तू दिलेल्या मला वेदनेत 
मी सर्वाच्या वेदनेवर  औषध देत आहे 


जास्तच रागावतेस कधी माझ्यावर 
सर्वांसहीत  तुझ्यावर ही तेवढेच प्रेम 
तू दिलेल्या शब्दात विष मला 
 मी विषाऱ्यास आता  अमृत देत आहे 


  रात्र रात्र जागवली आठवणीत तुझ्या 
 मी  जागणाऱ्यास    झुलवत आहे 
 दिवसाच्या येणाऱ्या अपयशात मला 
मी सूर्यच  यशाने भरून उगवित आहे 


 विसरलेस तू तुझ्या खऱ्या प्रेमिला 
 मी प्रत्येकाच्या वैऱ्यासोबती   आहे 
 परके केलेस तू तुझ्याच नात्याला 
मी परक्यासही आपुलकिले   आहे 


वगळलेस तू माझ्या नावाला 
तुझ्या शब्दाची ही पूजा करीत आहे 
 विसरलेस पेटलेल्या झाडाच्या सावल्याला 
 मी आजही त्यात जळत आहे  


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi