कधी कधी _ कविता

कधी कधी _ कविता 


कधी लाजते
कधी रुसव्या मनात
कधी गोड बोलते 
कधी गोडवा पुसते 


कधी स्तुती माझी
कधी खट्याळ बोलते
कधी दानवीर
कधी भिकारी सांगते 


कधी जीवलगा 
कधी  वैऱ्यात ठसवते 
कधी भेटते 
कधी अर्ध्यात सोडते 


कधी कळ्यात 
कधी दगडात  पाहते 
कधी डोळ्यात मूर्ति 
कधी आरसा पुसते 


 कधी पावसात 
ते  वेडावते वारे 
मिठीत  पापण्यांच्या 
 कधी व्याकुळ असते 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड






Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi