गर्भ गळिताचा _ कविता

 गर्भ गळिताचा _ कविता 


ती का नव्याने 
 मज पुन्हा पाहते 
मी अंधार एक 
ती प्रकाश मागते


 पाप गर्भातला मी 
 ती जीवदान मागते 
माझे हात  अपुरे  
ती दान मागते 


माझ्या स्वप्नभंग प्रेमाचे 
हाती रंगवले 
रक्त रांगोळ्यात 
मी सुखात पाहिले 


दरवळ फुलाची 
मी चेंगरून हाती 
 कधी कळ्यास 
  मी न फुलवून पाहिले 


 मी गर्भगळीथाचा   
होऊनिया  वैरी 
इवल्या इवल्या पावलाची 
माझी अंगण सुनी  


 मज हाती दान मोठे काय 
 कन्यारत्न  एक नाही 
सावलीचा शोध आशा  
 देह फाटकाच राही 


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi