वृक्ष वल्ली सोबती वाढवू

वृक्ष वल्ली सोबती वाढवू 


 येथे होती सौंदर्याची शाल
 गेली कोणत्या वाऱ्यावर 
साऱ्याचे येथे होते माहेर 
ओसाडले सारे माळरान 


येथे मधुर संगीताची शाळा 
पक्षाच्या चोची मधील गोडवा 
झुळझुळणाऱ्या झऱ्याची ओढ 
वाऱ्यात हळुवार छळते कोकिळा 


फुला फळांनी लवंडते झाडे 
चाखून फळे लावणी गंध 
हळद लावूणी  नटती  पाखर
ती छेळणारी  हळूच मेघ 


 पिकास आमुच्या मिळेल  सारे 
पाऊस थंडी ऊन कोवळे 
 निसर्ग देतो सर्वांना धडा 
 पुन्हा कधी ती भरेल शाळा 


नव्या वर्षाची नव्या वृक्षाची 
करू लावणी  रंगू वृक्ष यान 
नैसर्गि  सोंग निसर्गात करू 
हेच वर्ष पुन्हा मिळेल आयुष्यात 


 सर्वांनी सूत्रे हाती घेऊनी 
वृक्षारोपणी  मान वाढवू 
येता काळ दूर करू 
वृक्ष वल्ली  सोबती वाढु


राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा