आमचा घास _ कविता

 आमचा घास _ कविता 


कोण देतो कोण भावना ओळखतो 
 शब्दांना कुठेतरी तुम्ही चित्र पाहतो 
 विचित्र दिसला की अनोळखी सोंग घेतो 
देव तर कुठे फाटक्यांना विचारतो 


दगडांना खूप काही दान देतो 
माणुसकीला विद्रोहाचा शेंदूर पुसून 
सरकारी बांधिलकीची श्रीमंत तुम्ही 
गरिबांना कधी कुठे मोकळे सोडतो 


शेतकऱ्याची कसरत भावल्यांचा खेळ वाटतो 
सर्वाचं पोट भरवतो त्याच  हातावरती धरतो 
भुकेमुळे झाला कुठे अपघात जेथे 
शेतकरीच प्रथम मृत्यू  मुखात सापडतो 


देव देवता नेच केला हो आमचा घात 
सरकारचा कसा पोहोचेल तो हात 
बुद्धी जीवांचे चालते इथे  प्रशासन 
ओठावर एकाच्या पोटात एकाच्या 


 बांधून देतो हो आम्ही आमचाच घास 
 बांधून देतो हो आम्ही आमचाच घास


  
 राजेश मेकेवाड 

राजेश मेकेवाड



Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi