वेदनेत _ कविता

 वेदनेत _ कविता 


माझ्या ह्या मोगऱ्याला 
 आज काय झाले 
 फुलणाऱ्या पाकळ्यांची  
गंध कसी  हरली 


माझ्या ह्या सागराला 
आज काय झाले 
लाठेवरच्या रांगोळ्यात
 दुःख कसे भरले 


 हसणाऱ्या बागेला 
आज काय झाले 
 पहाताच माझ्याकडे 
पाणी फडफडले 


 उडणाऱ्या पाखराला 
आज काय झाले 
झेप आकाशी  
 पंख कसे तुटले 


 लाजऱ्या वेलीचे 
आज काय झाले 
सावल्याच्या   आडोशाला 
आज कसे दडले 


  कोकिळेच्या कंठाला 
 आज काय झाले 
 ओठात  सुर घेता 
 शब्द कसे रुसले 


माझ्या   ह्या प्रेमिकेला 
आज काय झाले 
वेदनेच्या गुच्छात 
एकटी दरवळले  


राजेश मेकेवाड ३०/१२/१६

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

Health and Physical Education Class 12 Solutions PDF in Marathi