तू कशाला _ कविता

  तू कशाला _ कविता


तुला तुझीच ओढ 
अन माझी साथ कशाला.
 एकांत जरी उरला
 तुझी दहशत कशाला. 


घार झाला माझाच जीव 
तुझी शिकार कशाला. 
वाट तुझीच शोधत गेलो 
तुझ्या जंगलात कशाला . 


उसळत गेलो नदीसारखा 
 स्थिर तुझा काट कशाला .
 वणव्यात गेले आयुष्य माझे
 वरती अश्रू तुझे कशाला. 


नशा चढली भलतीच 
तुझ्या साठी वेगळी नशा कशाला. 
अत्तरातून वेगळा झालो
 फुलांची संगत आता कशाला . 


गंध गेला दाहीदिशा
 ती दिशा आता कशाला.
 उरलो जरी गर्दित एकटा
 सोबतीला तु कशाला.


तुझ्या पालखीला हात माझा
माझ्या अंत्ययात्रेत तू कशाला 


कवि. रा.भा.मेकेवाड  

राजेश मेकेवाड


Comments

Popular posts from this blog

त्याशी राखा चक्रधर

पंचतत्व कविता

भाग्यवान पिढीकडून दिवाळीच्या शुभेच्छा